शहापूर येथे तथागत गौतम बुद्धांना अभिवादन
शहापूर येथे तथागत गौतम बुद्धांना अभिवादन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम, भंडारा : आनंद बुद्ध विहार शहापूर व पंचशील बुद्ध महिला मंडळ शहापूर यांच्या वतीने शहापूर येथे *आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र* यांनी बुद्ध पौर्णिमा निमित्त तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून,दीप प्रज्वलित करून,अभिवादन केले, व समस्त जनतेला बुद्ध पौर्णिमा निमित्त शुभेच्छा दिल्या,
त्यावेळी आमदार साहेब यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ, देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले,शांती,समता,अहिंसा यांची अनमोल शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची ही पौर्णिमा.याच दिवशी त्यांना जन्म,ज्ञान व महानिर्वाण प्राप्त झाले.बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना वंदन करताना त्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालण्याचा संकल्प करुया असे आमदार साहेब यांनी आपल्या भाषणात संबोधले. कार्यक्रमाप्रसंगी बौद्ध अनुयायी, सामाजिक कार्यकर्ता प्रमुख पदाधिकारी शहापूरवासी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत