Breaking News

गोठणगाव येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा कब्जा

 गोठणगाव येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा कब्जा


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी संतोष रोकडे, गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था गोठणगाव या संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित पॅनल ने 13 उमेदवार निवडून आणून आपल्या ताब्यात घेतली आहे दिनांक 15 मे रोजी या संस्थेची निवडणूक पार पडली विशेष म्हणजे भाजपाचे महामंत्री भोजराम लोगडे व त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला विजयी झालेल्या उमेदवारांची मध्ये रवींद्र लोकडे रघुनाथ मेश्राम नारायण हटवार तेजराम मडावी कांतीलाल मडावी देवराम पूराम शामराव मडावी रवींद्र घरतकर विश्वनाथ कोवे टेकराम मानकर कांतीलाल साखरे भागरथा राणे हिराबाई वाघमारे हे उमेदवार विजयी झाले विजयी उमेदवारांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले.



 हा झालेला विजय शेतकऱ्यांचा आहे असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजिनीयर यशवंत गणवीर यांनी सांगितले आहे विजयी उमेदवारांचे माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे अर्जुनी-मोर पंचायत समिती सदस्य घनश्याम धाम ट दींनदयाल डोंगरवार ताराचंद उईके संजय ईश्वर मधुकर लोगडे कृष्णा मांढरे सौरभ पशीने व इतर कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन विजयश्री खेचून आणण्यात मोलाची कामगिरी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत