Breaking News

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य साधून एकदिवसीय भव्य रक्तदान शिबिर

 महानगर भाजपा तर्फे रक्तदान शिबिर

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य 


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने मंगळवार 31 ला स्थानिक, डॉ शामाप्रसाद मुखर्जी,वाचनालय येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मुख्य मार्गदर्शनात व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात हे शिबीर सकाळी 10 ते 4 वाजता दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

भाजपा महानगर तर्फे यापूर्वी अनेक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.याचा थेट लाभ जिल्ह्यातील व इतर क्षेत्रातील सिकलसेल रुग्णांना  झाला.विद्यमान स्थितीत,रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक रुग्णांना रक्त पुरवठ्यासाठी भटकावे लागत आहे.रक्तदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विष्णू यादव व उमेश केवठ याचेसह भाजपाच्या सर्व आघाड्यांचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.यात प्रामुख्याने महामंत्री व मंडळ प्रमुखांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत