Breaking News

जिवती तालुक्यातील वनविभागाच्या कामात अनियमित्ता

 जिवती तालुक्यातील वनविभागाच्या कामात अनियमित्ता

 जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

 सामाजिक कार्यकर्त्यां सिंधूताई राठोड यांची कारवाहीची मागणी

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : अतिदुर्गम व मागासक्षेत्र अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील वनपरीक्षेत्रा अंतर्गत सन 2018,2019,2020 मध्ये करण्यात आलेल्या ग्याबीयन बंधारा, माती बंध,दगडी बंधारा सदर कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरवेव्हार झाला असून सदर त्या कामाची चौकशी करण्यात यावी.

या बाबतची तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यां सिंधूताई राठोड यांनी निवेदना द्वारे केली आहे.

मध्य चांदा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या जिवती वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत योजना व योजनेत्तर अंतर्गत ग्याबीयन बांधरे,दगडी बंधारे माती बांध कामे करण्यात आली मात्र सदरच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून काही जुन्याच बंधाऱ्यांना नवीन दाखवून अनुदान घेतलेले आहे या कामाची पूर्ण चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरप्रकार उघडकीस येणार

वरील सर्व कामाची जिवती वनपरीक्षेत्र कार्यालयातून माहिती मागवण्यात आली मात्र तीस दिवसाचा कालावधी पूर्ण होऊनही माहिती पुरविण्यात आली नाही त्यामुळे उप वनसंरक्षक मध्य चांदा विभागीय कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे अपीली अर्ज करण्यात आला त्या अर्जंनुसार दि.24/5/2022 मंगळवारी रोजी 11.. वाजता सिंधूताई राठोड वेळेनुसार सुनावणी कार्यालयात हजर झाल्या मात्र वनविभागाचे कोणतेही अधिकारी हजर न झाल्याने सुनावणी होऊ शकली नाही.

वनविभाग जिवती येथील कामातील गबळ उघडकिस होईल या भीतीने माहिती देण्यास वनविभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सिंधूताई राठोड यांनी केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत