Breaking News

तलाठी रोहित सिंगला वाचविण्यासाठी बल्हारपूर तहसिलदार संजय राईंचवार यांचा खटाटोप ?

 तलाठी दप्तर मधील रेकार्ड खोडतोड प्रकरण

 तलाठी रोहित सिंगला वाचविण्यासाठी बल्हारपूर तहसिलदार संजय राईंचवार यांचा खटाटोप ?

अद्याप "त्या" तलाठ्यावर कारवाई नाही ! 

 प्रिया झांबरेंनी केल्या वरिष्ठांकडे अनेक तक्रारी ,

न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याची झांबरेची तयारी ! 


महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर :
 
मागील दोन महिन्यां पासुन  आदर्श मिडीया एसोसिएशन तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी प्रिया झांबरे यांनी महसुल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास साझा क्रं १७ चे तलाठी रोहितसिंग चव्हाण यांनी सन २०२० मध्ये रेकार्ड खोडतोड करुन आदिवासी कलम ३६ हटविल्याची गंभीर बाब बल्लारपुरचे तहसिलदार संजय राईंचवार यांच्या निदर्शनासच नाही तर उपविभागीय अधिकारी दिप्ती सुर्यवंशी पाटील, जिल्हाधिकारी गुल्हाने, 


विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे , अपर मुख्य सचिव महसुल यांना पुराव्या सहित देऊन सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही .उलट तलाठी यांची बदली होत असल्याची चर्चा गावभर सुरु असल्याची  माहिती मिळाली असे झांबरे यांनी आज या प्रतिनिधीस सांगीतले. रोहितसिंग चव्हाण यांनी कशी व केव्हा खोडतोड केली ही बाब युवा स्वाभिमान पक्षाचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे, प्रिया झांबरे व युवा स्वाभिमान पक्षाचे शिष्टमंडळ तहसिलदार यांचेशी चर्चा करतांना त्यांना समजावुन देखिल सांगीतले.



१९९८ च्या सातबारा वर आदिवासी कलम ३६ च्या रकान्याला कंस आहे परंतु तोच सातबारा २०१९-२० पर्यंत लागु आहे. सर्वे नंबर ३१/९३ च्या २०१४ ते २०१९ च्या सातबारा वर वर्ग २ आणि कलम ३६ चा उल्लेख होता.२०२० मध्ये तलाठी रोहितसिंग चव्हाण यांनी खोडतोड केल्याचे पुराव्यासह स्पष्ट करुन दिले सन २०१६ पासुन बल्लारपुर साझ्याला तलाठी रोहितसिंग चव्हाण हे कार्यरत असुन सुद्धा त्यांनी वरिष्ठांना कळविण्यात कसुर केला हे स्पष्ट दिसत असुन वारंवार तक्रारी देऊन सुद्धा अद्याप त्याचेवर कारवाई करण्यात आली नाही असा आरोप प्रिया झांबरे यांनी केला आहे. त्यांचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहे.  


तहसिलदार संजय राईंचवार यांनी वारंवार दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अहवाल मागीतला . आपल्या पदाचा व अधिकाराचा वापर करुन चुका दुरुस्ती केल्या परंतु चुका करणारा कोण ? कर्तव्यात कसूर करणारा कोण ?? यांचा तपास करण्यात ते असमर्थ ठरले .मधुर व गोडीगुलाबीचे संबध तलाठ्यांशी असल्याचे हे आता पुर्णता दिसुन येते झांबरे यांनी अनेक पुरावे दिले परंतु तहसिलदार राईंचवार यांनी कोणाचे बयान न घेता तक्रारकर्त्यास सोबत न घेता तपास केला असा आरोप सुद्धा झांबरे यांनी केला आहे.


 महसुल विभागातील सरकारी रेकार्डला खोडतोड झाली असुन सुद्धा तहसिलदारांना काहीच फरक पडला नाही. चुका झाल्या आहेत म्हणुन चुका दुरुस्ती करण्यात आले. मग शासनाला चुका करणारा तलाठी कोण ? शासकीय सेवेत राहुन भु माफियांना सहकार्य करुन शासनाच्या पाठीत सुरा खुपसनाऱ्याची माहिती वरिष्ठांनपासुन का लपविण्यात येत आहे ? सरकारी रेकार्ड खोडतोड करुन सरकारी मालमत्ता भु माफीयाच्या हाती देणारा महान तलाठ्याला तहसीलदार हे पाठीशी का धरत आहे हे एक न उलगडणारे कोडेच आहे.  


या बाबत महसुल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी सुद्धा गप्प बसले आहे.  दोन महिने उलटुन गेले परंतु फक्त पत्रव्यवहार सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी अहवाल मागवतात पण तहसिलदार संजय राईंचवार हे तलाठ्याचा बचाव करुनच वरिष्ठांना खोटा व दिशाभुल करणारा अहवाल आजपर्यंत पाठवित आलेले आहे.त्या अहवालात रोहित सिंग यांनी रेकॉर्ड मध्ये खोडतोड केल्याचा कुठे ही  उल्लेख नाही.मग रेकॉर्ड तपासणी केली तर हा रेकार्ड खोडतोड करणारा पटवारी कोण हे त्यांना दिसुन आले नाही का ?हा ही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा यावर कधीच गंभीर पणे विचारणा केली नाही म्हणुनच मागील दोन महिन्यापासुन यातील खरा दोषी  कोण हे सुध्दा त्यांना कळले नाही. उलट त्याच या पटवा-याची बदली करतील यात आता शंका नाही. बदली करणे म्हणजे कारवाई नव्हे ?  उपविभागीय अधिकारी दिप्ती सुर्यवंशी पाटील यांचेकडुन देखिल या प्रकरणात कारवाई होण्यास विलंब होत आहे. 

तलाठी  रोहितसिंग चव्हाण हे बल्लारपुर साझा क्रं १७ मध्ये २०१६ पासुन कार्यरत आहे मग कर्तव्यात कसूर का करण्यात आले याकडे अधिकाऱ्यांनी आजपावतो दुर्लक्ष केले असुन आता परत दुसऱ्या साझा मध्ये बदली करुन चव्हाणला वरिष्ठांचे सहकार्य मिळत आहे हे सुद्धा नाकारता येत नाही असे प्रिया झांबरे यांनी सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत