Breaking News

29 मे रोजी कंत्राटी शिक्षक पदांसाठी लेखी परीक्षा

 

29 मे रोजी कंत्राटी शिक्षक पदांसाठी लेखी परीक्षा



महा घडामोडी न्यूज नेटवर्क, वाशिम : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्या अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये कला आणि संगणक शिक्षक या कंत्राटी पदांकरीता 24 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत आवेदन अर्ज मागवीले होते. कला शिक्षक या पदासाठी 144 आणि पाच अंशकालीन पदवीधर उमेदवारांसह एकूण 149 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहे. संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार पात्र ठरले. या दोन्ही कंत्राटी पदासाठी 29 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता अकोला येथील सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हील लाईन येथे ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरुप 100 प्रश्न असून प्रती प्रश्न 2 गुण असे एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा होईल. यामध्ये कंत्राटी कला शिक्षक पदाच्या लेखी परीक्षेकरीता सामान्य ज्ञान 70 प्रश्न व कला शिक्षक डिप्लोमा अर्हतेवर आधारीत 30 प्रश्न असतील. कंत्राटी संगणक शिक्षक पदाच्या लेखी परीक्षेकरीता सामान्य ज्ञान 70 प्रश्न आणि संगणक विषयासंदर्भात 30 प्रश्न राहतील.

वरील परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना आवेदन पत्रात नमुद केलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना 24 मे पर्यंत प्रवेशपत्र प्राप्त होणार नाही त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला, महसूल भवन इमारत, माहेश्वरी भवनाजवळ, न्यु. राधाकिसन प्लॉट, अकोला येथे कार्यालयातून 25 व 26 मे यादिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.    

शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज 25 मेपर्यंत ऑनलाईन सादर करावे

 सन २०२१-२२ या सत्रातील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज व त्रृटी पुर्ततेकरिता विद्यार्थ्यांचे लॉगीनला परत करण्यात आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे.

 जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालकांनी या प्रलंबित अर्जाची त्रृटी  पुर्तता करुन आवश्यक कागदपत्रांसह पात्र अर्ज 25 मे २०२२ पर्यंत ऑनलाईन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास तात्काळ सादर करावे. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर ऑनलाईन योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज 25 मेपर्यंत अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ऑनलाइन फॉरवर्ड करावे. Send Back अर्ज जास्तीत जास्त प्रमाणात व त्वरीत निकाली काढावे. अन्यथा विहित मुदतीत अर्ज या कार्यालयास सादर न केल्यास व विद्यार्थ्यांकडुन शासन अनुज्ञेय शुल्क वसुल केल्यास संबंधित महाविद्यालय कारवाईस पात्र राहिल यांची नोंद घ्यावी. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.

व्हॉलीबॉलच्या कौशल्य वृध्दीचे मिळणार प्रशिक्षण

गुणवंत खेळाडू मुलींचा शोध सुरु

व्हॉलीबॉल या खेळाबाबत कौशल्य वृध्दीचे मर्यादित कालावधीचे अत्युच्च प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण गुणवंत खेळाडू असलेल्या मुलींना देण्यात येणार आहे, त्यासाठी खेळाडू मुलींचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिमने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 नुकतेच 22 एप्रिल ते 11 मे 2022 या कालावधीत मुलांसाठी 20 दिवसाचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाले. मुलींनासुध्दा अशाच प्रकारचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर व्हॉलीबॉलचे तामिळनाडू येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.

व्हॉलीबॉल खेळासाठी मुली खेळाडूंचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावे. उंची 175 सेंमी. व त्यापुढे शाळेत शिक्षण घेत असल्याचा दाखला (बोनाफाईड) सोबत आणावा. जिल्हयात गावपातळीपासून असलेल्या शाळा, क्रीडा मंडळे, संस्थामधील खेळाडू तसेच सन 2019-20 मध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या शाळेतील खेळाडू या वयोगटामध्ये असल्यास व उंचीची अट पुर्ण करीत असल्यास त्यांना या प्रशिक्षण शिबीरासाठी सहभागी होता येईल.

 जिल्हयातील जास्तीत जास्त पाच खेळाडूंची निवड करण्यात येईल. त्यामध्ये एक-सेटर, दोन-अटॅकर आणि दोन युनिव्हर्सल/ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे/ खेळाडूंच्या खेळातील खेळण्याची जागा यानुसार असल्यास उत्तम राहील. खेळाडूंची उंची प्रत्यक्ष खात्री करुन पाठवावी. निकषानुसार उंची आढळून न आल्यास व पाठविण्यात आलेला खेळाडू हा व्हॉलीबॉल खेळाच्या सरावातील नसल्यास किंवा या खेळाशी निगडीत नसल्यास अशा खेळाडूला सहभागी करुन घेतले जाणार नाही. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या खेळाडूंनी पुन्हा अर्ज सादर करु नये.

 अधिक माहितीसाठी वाशिम येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व बालाजी शिरसीकर तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत