Breaking News

रावेर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात वाढतेय अतिक्रमण

 रावेर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात वाढतेय अतिक्रमण - नगरपालिका रावेर आहे कुठे

लोकप्रतिनिधी सोबत नगरपालिकाहि कुंभकर्णी झोपेत

नागरिकांनी रोडावरून चालावे की घराच्या बाहेरच निघू नये 

का करतेय न.पा रावेर सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे ढोंग 

कितीक नाहक बळी गोर गरिबांचे अजून जाणार


महा घडामोडी न्यूज विशेष प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : रावेर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील विक्रेत्यांच्या गाड्यांची गर्दी रावेरकरांना नवीन नाही. हा चौक गावातील मुख्य चौक आहे ,खरेदी करण्यासाठी लोकांची खुप गर्दी या ठिकाणी होत असते परंतु फळ विक्रेत्यांच्या लोट गाड्या या ठिकाणी दुकानांच्या पुढे लागतात आणि काही औषधे घेण्यासाठी लोकं गावात मेडीकलकडे येतात काही जीवनावश्यक वस्तूंच्या साठी येतात परंतु या गाड्यांची एवढी मोठी गर्दी येथे असते की का रोडाच्या मधून चालावे की येऊच नये गावात अशी भयंकर परिस्थिती आहे. 

याच मार्गाने एस टी बसेस ट्रक आणि इतर मोठया गाड्यांची वर्दळ या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातूनच होत असते अनेकदा येथे ट्राफिक ला समस्या निर्माण होते परंतु या गाड्यांमुळे गर्दी काही कमी होत नाही ,अश्या गर्दी मुळे या ठिकाणी 2 ते 3 गोरगरीब लोकांचे जीव सुद्धा गमवावे लागले आहेत तरीही रावेर ची गेंड्याचे कातडी असलेली न पा झोपेचे सोंग अनेकदा घेते ,

कोणत्याही प्रकारची कारवाई का करत नाही, कोणाचा दबाव या नगरपालिकेवर आहे, कोणाच्या इशाऱ्यामुळे कारवाई होत नाही ,का नगर परिषद रावेर वाढलेले अतिक्रमण काढत नाही आणि का नेहमीच टाळाटाळ सुज्ञ नागरिकांना केली जाते ,का कर्तव्यात कसूर शासकीय अधिकारी अर्थात प्रशासक करतात हे गौडबंगाल काय आहे हेच कळायला मार्ग नाही.

     वारंवार येथील लोकप्रतिनिधिंना समस्या सांगून सुटत नाही ,सर्वात महत्वाचे येथे कधीही नगरपालिकेत गेलो असता प्रभारी सी ओ भेटतात ,त्यांना समस्या सांगितली जाते परंतु त्यांच्या कडे दुसऱ्याही नगरपालिका charge असल्याने ते कदाचित लक्ष व्यवस्थित देत नाहीत पण का या नगरपालिकेला कायम स्वरूपी मुख्य अधिकारी लाभत नाही, का जाणून बुजुन प्रभारी charge इथले मंडळी करतात हे एक रहस्य चं आहे.

   अपेक्षा अशी आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाढलेली लोटगाड्यांची गर्दी कशी कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढू नयेत व नाहक जीवित हानी होऊन एकाद्याचा परिवार उघड्यावर येऊन बरबाद होऊ नये म्हणून प्रशासकाने आता डोळे उघडले पाहिजेत असा सुर रावेर वाशीय लावत आहेत त्वरित मुख्याधिकारी साहेब या ठिकाणी योग्य ती कारवाई करतील आणि गोरगरीब जनतेची मदत करतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत