जिल्हा परिषद सभापती ची निवडणुक रंगतदार
जिल्हा परिषद सभापती ची निवडणुक रंगतदार
नाराजी, जातीय समीकरण, तालुक्याचे संतुलन साधत सभापती निवडणूक शांततेत पार
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधीःःनरेंद्र मेश्राम,भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडली. जातीय समीकरण, पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरांना सामावून घेताना काँग्रेस नेत्यांना सभापती निवडताना मोठीच कसरत झाली. चार सभापतींची निवड केली गेली. काँग्रेसमध्ये अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक होते. भाजप बंडखोराला एक सभापतीपद दिल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला तीन सभापती पदे आली. या तीन सभापतींची निवड करण्याचे आव्हान काँग्रेसपुढे होते. यावरूनही रुसवे-फुगवे आणि नाराजी मोठ्या प्रमाणात झाली.
सभापती निवडताना काँग्रेसला अनेक समीकरणांचा विचार करावा लागला. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेली नाराजी, जातीय समीकरण, तालुक्याचे संतुलन साधावे र लागले. मात्र भंडारा विधानसभा क्षेत्रावर अन्याय झाल्याने भंडारा तालुकामधील कार्यकर्ते नाराज होते. पवनी तालुक्याला अध्यक्षपद तर भाजप बंडखोर गटामुळे उपाध्यक्षपद तुमसर तालुक्याला मिळाले आहे. आता पाच तालुक्यांतून चार सभापती निवडायचे होते .
त्यातही एक सभापतीपद भाजप बंडखोर सदस्य कडे गेले . अशा परिस्थितीत काही सदस्यांची नावे सभापती पदासाठी काँग्रेस मधून चर्चेत होती. त्यात तुमसर तालुक्यातील बपेरा गटाचे रमेश पारधी, लाखनी तालुक्याच्या केसलवाडा गटाच्या सौ. स्वाती नरेंद्र वाघाये, साकोली तालुक्यातील वडद गटाचे मदन रामटेके यांची होती. तर विकास फौंडेशन चे अपक्ष उमेदवार सेलोकर यांचे नाव निश्चित होते. त्यानुसार चारही लोकांची सभापती पदी वर्णी लागली.
माजी आमदार सेवकभाऊ वाघाये चे कथित अपक्ष बेपत्ता
साकोली क्षेत्रातील माजी आमदार सेवकभाऊ वाघाये आणी नानाभाऊ पटोले यांच्यातील वैर कायमच चर्चेचा विषय पण नानाभाऊ पटोले यांनी त्यांची भावसून यांना उमेदवारी देऊन निवडून सुद्धा आणले होते. त्यांची भावसून सौ. स्वाती नरेंद्र वाघाये यांना सभापती बनविण्या करिता त्यांनी दोन अपक्ष सदस्य असल्याचे व कांग्रेस च्या बाजूने मतदान करतील यांची हमी दिली होती. परंतु कांग्रेस पक्षाच्या इतर उमेदवाराला सोडाच सौ. स्वाती वाघाये यांना सुद्धा दोन अपक्षांनी मतदान केले नाही. परंतु नानाभाऊ नी नरेंद्र वाघाये यांना दिलेला शब्द पाळत सौ. स्वाती वाघाये यांना सभापती बनविले.
माजी आमदार चरणभाऊ वाघमारे ठरले खरे हिरो
बंडखोरी चा ठपका ठेऊन माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांना निष्काशित केले गेले. त्यांचा चाहता वर्ग तुमसर विधान सभाक्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या विकास फौंडेशन गटाचे ६ उमेदवार निवडून आले होते. त्यांची सुरवातीची भूमिका तटस्थ राहण्याची होती. त्यांच्या क्षेत्रात त्यांची लढाई राष्ट्रवादी कांग्रेस सोबत असल्याने त्यानी राष्ट्रावादी सोबत सत्तेत सहभागी होण्यास स्पष्ट नकार होता .
त्यातच ते आमदार परिणय फुके यांच्या कुरघोडी च्या राजकारणाला पूर्ण पणे कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी “सौ सोनार कि एक लोहार कि” करीत धाडसी निर्णय घेत कांग्रेस बरोबर हात मिळवणी करीत सत्तेत सहभागी झाले. एका अपक्ष उमेदवाराला सभापती बनवून परत मनाचा मोठे पणा सिद्ध केला.
त्यामुळे कार्यकर्त्यांचा नेता म्हणून आपली छाप जनतेच्या मनात कोरली. आणी खऱ्या अर्थाने माजी आमदार चरणभाऊ वाघमारे जिल्हा परिषद राजकारणाचे खरे हिरो ठरले. शेवटी “जहा चरण वहा किसीका नही मरण” म्हण सार्थ ठरविली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत