दरवाज्याला लॉक ठोकून सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंते झाले गायब
दरवाज्याला लॉक ठोकून सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंते झाले गायब
सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलूच्या अभियंत्यांच्या बंद दरवाज्यावर भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने निवेदन चिटकवण्यात आले.
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,सेलू : उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सेलूला साळेगाव-मोरेगाव रोडवरील मोठमोठे खड्डे तात्काळ बुजविणे बाबत निवेदन द्यायला भाजप कार्यकर्ते गेले असता जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. म्हणून हे आंदोलन करण्यात आले.
चिटकवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, साळेगाव पाटी ते मोरेगाव पर्यंतचा रोड जेसीबीने खोदून मोठमोठे खड्डे केलेले आहेत व हे खड्डे करून त्याच्यावर जाड खडी टाकण्यात आलेली आहे व काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला ही खडी टाकण्यात आलेली आहे व हा पराक्रम करून संबंधित गुत्तेदार फरार झाला आहे पण या पराक्रमामुळे येणारे जाणारे वाहनधारक त्रस्त झालेले आहेत या खड्ड्यामध्ये मुळे व खडी मुळे वाहन धारक पडत आहेत व जखमी होत आहेत इमर्जन्सी पेशंटला या रस्त्यावरून जाताना प्रचंड त्रास होत आहे.
या रस्त्यावर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून येत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत व या रस्त्यावर पडून जखमी झालेल्या लोकांची नुकसान भरपाई संबंधित ठेकेदाराकडून घेण्यात यावी नसता भारतीय जनता पार्टी सेलू व ग्रामस्थांच्यावतीने मोठाल्या खड्ड्यामध्ये मंडप ठोकून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष जयसिंग शेळके, नागेश ठाकूर, संदीप बोकन, दगडोबा जोगदंड, अर्जुन बोरुळ, दत्ता पवार, शरद आकात, महिंद्रा गाडे, सतिश काकडे, विजय नाईक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत