Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद

 प्रियदर्शनी सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर :
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील कोणताही नागरिक विकासापासून वंचित राहू नये व त्याच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने 31 मे 2022 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिमाचल प्रदेशातील शिमला येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील प्रियदर्शनी सभागृहात करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या शिमला येथील कार्यक्रमाशी जिल्ह्याला जोडले जाणार असून पंतप्रधानांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित केला जाईल. संवादाचा पहिला भाग जिल्हा कार्यक्रमाच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरू होऊन सकाळी 10.50 वाजता समारोप होईल. या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरीत केला जाईल. संवादाच्या दुस-या भागात निवड केलेल्या जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आभासी संवाद साधतील.

या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, एक राष्ट्र एक राशनकार्ड योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा समावेश आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 29 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 29 मे रोजी स. 10.30 वाजता हरंबा (ता. सावली) येथे आगमन व मातोश्री ग्राम समृध्दी शेत पांदन रस्ते योजनेंतर्गत पांदन रस्त्याच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स. 11.15 वा. सावली येथे राकेश गड्डमवार यांच्याकडे सांत्वनपर भेट, स. 11.45 वा. जिबगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आणि पांदन रस्त्याच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.45 वा. मोखाळा येथे श्री. नागोसे यांच्याकडे सांत्वनपर भेट, दु.1वा. व्याहाड खुर्द येथे आदिवासी सामाजिक प्रबोधन मेळाव्यास उपस्थिती, 

दु. 2 वा. व्याहाड खुर्द येथून गडमोशी (ता. सिंदेवाही) कडे प्रयाण. दु. 3 वा. तांबेगडी मेंढा (ता. सिंदेवाही) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दु. 3.30 वा. गडमोशी येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भुमिपूजन, सायंकाळी 4 वा. कच्चेपार येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन व कॅनाल क्रॉसिंग पुलाचे लोकार्पण, सायं 4.30 वा. सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी, सायं 5 वा. किन्ही येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 5.30 वा. मुरमाडी येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 6.15 वा. मोहाडी येथे 33 केव्ही सबस्टेशनची पाहणी, सायं. 6.30 वा. मोहाडी येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 6.45 वा. वाघमारे यांच्याकडे सांत्वनपर भेट, सायं. 7 वाजता कोराडी (नागपूर) कडे प्रयाण. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत