बल्लारपुर चे तहसीलदार संजय राईंचवार यांनी प्रिया झांबरे यांना तहसील कार्यालयात येण्यास केली मनाई
बल्लारपुर चे तहसीलदार संजय राईंचवार यांनी प्रिया झांबरे यांना तहसील कार्यालयात येण्यास केली मनाई
अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्ताकडे मेल द्वारे तर जिल्हाधिकारी यांना स्परस्पंर भेटुन दिली तक्रार
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,बल्लारपूर ; बल्लारपुर तहसिलदार संजय राईंचवार यांनी प्रिया झांबरे यांना तहसील कार्यालयात येण्यास मनाई केले. कोणत्याही कर्मचारी, नायब तहसीलदार कोणालाही भेटायचे नाही ,जर आले तर गुन्हा दाखल करण्यात येईल असे भिती दाखवुन कार्यालयातील आवश्यक पुरावे काढण्यात बाधा निर्माण करीत असल्याचे बतावणी करत होते त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्लारपुर विधानसभा महिला अध्यक्षा प्रिया झांबरे यांनी जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांचेकडे तक्रार दिली.
तहसिलदार यांना तलाठी नी आदिवासी जमिनीमध्ये खोडतोड केल्या प्रकरणातील मागीतलेले कागदपत्रे ते द्यायचे की नाही हे ठरविले जाईल आणी नंतरच दिले जाणार, मागील अनेक वर्षापासुन सरकार कडुन आदिवासीनां जमिनी वाटपात मिळालेल्या, तलाठी यांनी भु माफीयांशी संगनमत करुन जिल्हाधिकारी साहेब यांची परवानगी न घेता वाटपाची जमीनीच्या खरेदी विक्री प्रकरणात काही टक्के रक्कम शासन जमा करावी लागते ते केली काय ?
रक्कम न भरता वर्ग २ (भु-धारी) , मधुन वर्ग १ ( भु-स्वामी) मध्ये रुपान्तर केले. कलम ३६ हटविण्यात आले. अनेक जमिनीची जसे सर्वे नंबर ३१/११६ ची खरेदी विक्री झालेली आहे. याची तक्रार मी जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे केली आणी चर्चे दरम्यान सविस्तर मुद्देसुर, कागदोपत्री पुराव्यासहित निवासी जिल्हाधिकारी साहेब मेश्राम साहेब यांचे कडे दिली आहे.
युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्लारपुर विधानसभा महिला अध्यक्षा प्रिया झांबरे यांनी ही बाब जिल्हाधिकारी पर्यंतच सिमीत ठेवली नाही तर ही तक्रार अपर मुख्य सचिव मुबंई तसेच विभागीय आयुक्त भारती खोडे यांना मेल द्वारे त्वरित पाठविली आहे. राजस्व विभागाचे एका जमीनी मागे रक्कमेचे नुकसान होत आहे.
ही बाब युवा स्वाभिमान पार्टी तसेच आदर्श मिडीया एसोसिएशन च्या पदाधिकार्यांच्या लक्षात येत आहे मग ज्या विभागात कार्यरत असणारे अधिकारी यांच्या निदर्शनास वारंवार पत्रव्यवहार करुन आणुन दिले पण ही राजस्व विभागाचे नुकसान न दिसण्यामागील कारण काय समजावे ? तहसिलदार संजय राईंचवार तलाठी च्या विरोधात ठोस पाऊल उचलणार की, मधुर गोडीगुलाबीचे नाते संबध आडवे येणार असा प्रश्न निर्माण होत आहे ?
प्रिया झांबरे यांना तहसिलदार यांनी दोन दा बोलले की कार्यालयात येऊ नका आमच्या बाबु लोकांना त्रास होतो. तहसील कार्यालयात मोठे लोक आले की मधुर आणी गोडीगुलाबीचे नाते संबध ठेऊन चहा पाणी घेत चर्चा करतात मग झांबरे यांनी काय वाईट काम केले असेल, रेकार्ड ला असलेली कागदपत्राच्या सत्य प्रती मागीतल्या हे चुकिचे आहे काय ?
दिनांक ०२ मे २०२२ पासुन १८ मे पर्यंत प्रिया झांबरे यांनी दिलेले अर्ज रामटेके कडे फाईल मध्ये धुळ खातांना पाहुन चिडुन बोलल्या व नायब तहसीलदार यांचे कडे तोंडी तक्रार केली म्हणुन प्रिया झांबरे यांना कार्यालयात येण्यास नकार दिला असावा, तहसिलदार म्हणतात की आवाज लहान करा, पण ज्यांचा आवाज जन्मताच पाहडी आवाज असेल तो कुठुन व कसे आवाज लहान करणार ?
प्रिया झांबरे, युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्लारपुर विधानसभा महिला अध्यक्षा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत