Breaking News

पुनखेडा येथील नदीवरील पूल बांधकाम अतिशय निकृष्ठ दर्जाचे

 पुनखेडा येथील नदीवरील पूल बांधकाम अतिशय निकृष्ठ दर्जाचे 

सार्वजनिक बांधकाम खाते आहे तरी कुठे ?

कोणत्याच शासकीय अधिकाऱ्याचे नियंत्रण ठेकेदारावर नाही

 जनतेच्या पैश्याची सर्रास लूट

 एका पुराच्या पाण्याने पुल वाहून जाण्याची नागरिकांना भीती


 महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी दिपक तायडे,
जळगांव :
 रावेर येथून अवघ्या 3 km अंतरावर एक छोटंसं पुनखेडा नावाचं गाव आहे येथे गेल्या काही दिवसांपासून नदीवरील पुलाचे बांधकाम अतिशय वेगाने आणि घाईघाईने जोरात सुरु आहे. मुक्ताई नगर अर्थात विदर्भात जाणारा हा एक मार्ग देखिल आहे परंतु या ठिकाणी होत असलेले नदीवरील पुलाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की याकामी माती मिश्रीत रेतीचा वापर खूपच जास्त प्रमाणात करण्यात आला आहे ,सदरची रेती ही नाल्याची असल्याची दाट शक्यता आहे याचे कारण असे की रेती या भागात शासनाने बंदी केलेली आहे आणि येथे रेती शुद्ध स्वरूपात असणे मुश्कील आहे अशात या पुलाच्या बांधकाम कामी जी रेती वापरली जात आहे.

 ती निकृष्ठ दर्जाची असून सदरचे बांधकाम हे ठेकेदाराकडून बोगस करण्यात येत आहे .हे बांधकाम जर असेच सुरू राहीले तर संपूर्ण पूल हा निकृष्ठ दर्जाचा होवू शकतो यात शंकाच नाही, हे निकृष्ठ दर्जाचे काम त्वरीत बंद करण्यात यावे अन्यथा मोठा अनर्थ टाळणे अश्यक्य आहे. या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे  जीवितहानी तर होईलच परंतु देशाच्या संपत्तीचा सुध्दा नासोडा होऊन मोठे आर्थिक नुकसान होईल, आर्थिक हानी भरुन काढता येईल परन्तु जिवीत हाणीचे काय?त्यामुळे सदरचे निकृष्ठ दर्जाचे नदीवरील पुलाचे काम लवकरात लवकर बंद करून ठेकेदाराकडून योग्य प्रकारे करून घेण्यात शासनास काय हरकत आहे.

   देशातील जनता प्रत्येक गोष्टीचा कर भरते परंतु त्या कर रुपी पैशाचा असा दुरुपयोग अधिकारी आणि ठेकेदार करतात आणि निकृष्ठ दर्जाचे बांधकाम लोकप्रतिनिधी सुध्दा लक्ष न देता यांना सहकार्य करताना दिसतात त्यामुळेच हे ठेकेदार कोणालाही जुमानत नाहीत, अश्या घटनांना सुज्ञ नागरीक विरोध करतात पण बोगस काम मात्र का थांबत नाहीत म्हणून हे निकृष्ठ दर्जाचे पुलाचे बांधकाम त्वरीत थांबवून सदरच्या कामाची पाहणी क्वालिटी कंट्रोल कडून करून काम बंद करावे अशी जाणकार जनता मागणी करीत आहेत.

  सदर च्या निकृष्ठ दर्जाच्या बांधकाम कामाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सोईस्कर दुर्लक्षच होत असल्याचे जाणकारांचे मत पक्के झाले आहेत कारण बातम्यांचा या ठिकाणी काहीही उपयोग होतांना दिसत नाही, कारण निकृष्ठ दर्जाचे बांधकाम बंद नव्हता राजरोसपणे सुरूच आहे.

  भविष्यात या निकृष्ट दर्जाचे पुलाच्या बांधकामामुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, तरी सुस्तावलेले सार्वजनिक बांधकाम खाते या पुलाच्या बंदकामाकडे कधी लक्ष देतील अशी रावेर तालुक्यातील जनतेत चर्चा सुरू झाली आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम त्वरित थांबवून सदरच्या ठेकेदाराचे बिल अदा होऊ नये आणि हे काम थांबवुन उत्कृष्ठ दर्जाचे करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत