Breaking News

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवा म्हणून प्रकल्पग्रस्तांनी केले जलसत्याग्रह आंदोलन

 दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवा म्हणून प्रकल्पग्रस्तांनी केले जलसत्याग्रह आंदोलन

महा घडामोडी न्यूज  तालूका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर,वरोरा : अनेक वर्षांपासून रखडलेल्या दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही त्यामुळे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेना व वर्धा नदीच्या संगमावर केले जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

 सावंगी , दिंडोडा, माढेळी, पवनी, बामरडा व वर्धा जिल्ह्यातील गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा वाढीव मोबदला मिळवण्यासाठी काल दिवसभर जलआंदोलन केले. आंदोलनात प्रकल्पग्रस्त मधील संपूर्ण कुटुंब सामील झाले होते.

काल शुक्रवारला सुमारे तेवीस वर्षांपूर्वी पीडित शेतकऱ्यांकडून कमी मोबदल्यात शेत जमिनी निप्पोन डेंरो प्रकल्पासाठी घेण्यात आल्या होत्या. प्रकल्पा करीता घेतल्या मात्र मोबदला अतिशय कमी दिल्याने अनेक वर्षे शासनाला मागणी केली पण दुर्लक्ष केले गेले शेवटी आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वाहत्या नदीत जल सत्याग्रह आंदोलन केले.   

    शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की, दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना एकरी वीस लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, व शासकीय नोकरीमध्ये कुटुंबातील एका व्यक्तीचा समावेश करावा. रोजगार प्रशिक्षण व रोजगार उभारणीसाठी अनुदान देण्यात यावे, जे प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहे त्यांना पर्यायी शेतजमीन उपलब्ध करून देण्यात यावी. 

दिंदोडा प्रकल्प बाधित गावातील परिवारांचा आर्थिक व सामाजिक अभ्यास करण्यात यावा वर्धा नदीच्यातीरावरील प्रकल्पबाधित गावाचे दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त म्हणून पुनर्वसन करण्यात यावे प्रकल्पबाधित शेतजमिनीवर ज्यांचे उदरनिर्वाह होता असे शेतमजूर यांना सुद्धा विशेष पॅकेज देण्यात यावे व त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी वर्धा वेणा नदी तीरावरील प्रकल्प बाधित गावातील मच्छिमार बांधवांसाठी विशेष पॅकेज देण्यात यावे व प्रकल्पामध्ये मच्छिमारी करण्याकरता त्यांना प्राधान्य देण्यात यावे .

   दिनांक 4 ऑक्टोंबर 2018 ला एकत्र आलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पाटबंधारे विकास महामंडळाने अधिनियम 1997 मधील रतुदीनुसार 34 कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार हेक्‍टरी तीन लक्ष। रुपये संबंधित प्रकल्पग्रस्त व दिलेल्या तारखांना वाटप करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर हे मोठ्या संख्येने उपस्थित होऊन वर्धा नदीच्या पात्रात सावंगी येथील पीडित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा वाढीव मोबदला व वरील मागण्या पूर्ण करावा या उद्देशाने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले व प्रशासनाकडून लवकरात लवकर दखल घ्यावी याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत