रावेर येथील ठाकूर नामक ठेकेदाराने स्वच्छता करण्याचे 100% दिले आस्वासन
रावेर येथील ठाकूर नामक ठेकेदाराने स्वच्छता करण्याचे 100% दिले आस्वासन
रावेर न पा च्या मुख्याधिकारी मालगावे मॅडमने शौचालयांचा दरवाज्याचे केले इस्टिमेट तयार, लवकरच शौचालयांची होणार कायापालट
सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वतः साफसफाई कामगारांकडुन करून घेण्यास महा घडामोडी न्युज चॅनेल व वेब पोर्टल च्या पाठपुराव्यामुळे शेवटी तयार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : गेल्या आठवड्यापासून महा घडामोडी न्युज चॅनेल व वेब पोर्टल ने रावेर शहरातील सार्वजनिक शौचालयांची समस्या आपल्या माद्यमातून सोडवण्यासाठी वृत्ताकनाचे काम केले यावर उत्तर म्हणून स्वतः मुख्यअधिकारी मॅडम यांनी ठेकेदारास स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यास सक्तीने सांगितले अन्यथा हयगय केली जाणार नाही अस ठेकेदारास सुनावले, परंतु आपली चुक कबूल करत ठेकेदाराने यापुढे स्वच्छता दररोज ठेवण्याचे सांगितले.
111111111111111
लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील शौचालयांची दुरुस्ती करुन शौचालयांची दरवाजे लावले जातील परंतु दरवाजे कोणी काढून घेऊन जाणार नाही याची दक्षता मात्र नागरिकांनी घ्यावी असे ठाकूर ठेकेदाराने आणि सीओ मॅडम यांनी त्यांचे म्हणणे खुलासा करताना सांगितले. यापुढे अस्वच्छ वातावरण निर्माण होणार नाही असे आरोग्य निरीक्षक युवराज गोयर यांनी शब्द देऊन आपण आपले कर्तव्य पार पाडू असे त्यांनी आमच्या प्रतिनिधी शी या विषयावर चर्चा करताना सांगितले.शेवटी महा घडामोडी न्यूज चॅनेल ला यश आले व गेल्या आठवड्यापासून चाललेल्या उधनाला विराम मिळाला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत