Breaking News

दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार,विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

 दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार,विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

पालांदुर पोलीस स्टेशनला निवेदन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम, भंडारा : भंडारा तालुक्यातील जेवनाळा येथे गावात अवैध दारू विक्री सुरू असल्यामुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे.अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून गावातील अवैध दारू विक्री बंद करावी असे निवेदन जेवनाळा येथील महिलांनी पालांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिले.

गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून सामाजिक वातावरण बिघडले आहे .अनेक तरुण मंडळी दारूच्या आहारी गेली आहेत.त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभा नुकतीच आयोजित केली होती.या ग्रामसभेत दारूबंदीचा एकमुखी ठराव मंजूर केला गेला. यावेळी दारू बंदी समिती स्थापन करण्यात आली.यामध्ये दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे ठरले.ठरावाची प्रत व निवेदन पालांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विरसेन चहांदे यांना देण्यात आले. 

 निवेदन देतांना सरपंच वैशाली बुरडे,उपसरपंच धर्मपाल लांबकाने, ग्रामपंचायत सदस्य मंगला रोकडे ,तंटामुक्ती अध्यक्ष सागर कावळे,पोलीस पाटील विना सेलोकर,दारूबंदी समितीच्या अध्यक्ष शुभांगी लुटे, उपाध्यक्ष किरण हेमने,सदस्य रेखा गडपायले व बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.

पालांदूर पोलिस ॲक्शन मोडमध्ये विशेष ग्रामसभेत दारूबंदीच्या एकमुखी ठरावानंतर गावात अवैध दारू विक्रीची माहिती मिळताच अवैध दारू विक्री करणारा मुनेश्वर नागदवणे याच्यावर धाड टाकत ९१ टिल्लू हस्तगत करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार कारवाई करण्यात आली.या कारवाई बद्दल पालांदूर पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

 गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून दारूबंदीचा एकमुखी ठराव घेण्यात आला.गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

वैशाली बुरडे,सरपंच ग्रामपंचायत जेवनाळा

 

 जेवनाळा ग्रामस्थांतर्फे दारूबंदीचा ठराव केला आहे.याचा आदर्श घेऊन ज्या गावात अवैध दारू विक्री होत असेल त्या गावांनी दारूबंदीचा ठराव घेऊन पोलीस स्टेशनला द्यावा निश्चितच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

विरसेन चहांदे,ठाणेदार,पोलीस स्टेशन पालांदूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत