रावेर येथील शौचालयाचा ठेकेदार ठाकुर कोणालाही जुमानेना
रावेर येथील शौचालयाचा ठेकेदार ठाकुर कोणालाही जुमानेना
ठेकेदारापुढे नगर परिषद रावेरने टाकली कात
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे, रावेर : रावेर मधील शौचालयांची जबाबदारी ही ठाकूर नामक ठेकेदाराची असून तो मात्र हात वर करून बोट मात्र न पा रावेर कडे दाखवतो, परंतु या भाऊला ठेका न पा रावेर ने दिलेला आहे तो काही लोकांची परेशानी वाढवण्यासाठी नाही दिला, काम तर करत नाही मात्र न चुकता पैसे न पा रावेर पासून घेऊन हा नंतर दुर्लभ कश्यप होतो, याला शौचालयांची साफसफाई बाबत विचारले असता तक्रारींवर हा कधीच लक्ष देत नाही द्यायचीच झाली तर धातूर मातूर उडवा उडावीची उत्तरे हा ठेकेदार देत असतो, याने अश्या प्रकारचे उत्तर देण्याचे प्रशिक्षण घेतले की काय असे जाणवते.
रावेर नगर परिषद च्या प्रभारी आरोग्य निरीक्षक गोयर यांना स्वच्छता आणि दरवाज्याबद्दल विचारले असता ते नेहमी सांगतात लावू परंतु दरवाजे लावलेले नाहीत त्या नंतर सर्वात महत्त्वाचे असे की या ठाकूर ठेकेदारावर नगर परिषद रावेर चे कोणतेही नियंत्रण नाही हा ठेकेदार कुणाचेही ऐकून घेत नाही म्हणजे याची दबंगगिरी न पा रावेर येथे निर्वाद यशस्वी झाली आहे, कुणालाही हा जुमानत नाही आणि अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतो.
रावेर शहरातील स्त्रिया सह पुरुष वर्ग शौचालयांमुळे पूर्ण वैतागले आहेत आणि नगरपालिका रावेर त्याच्या समोर कात टाकताना आढळते त्यामुळे हा ठेकेदार ना दरवाजे बसवत आहे ना साफसफाई कडे लक्ष देत आहे दुर्गंधी मुळे नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे कारण कोरोनाची लागण झालेले बरेच रुग्ण श्वसनाच्या समस्येमुळे ऑक्सिजन ची कमतरता भासन दगावलेत आणि अस्वच्छता मुळे कितीतरी पटीने रोगराई वाढीस लागते हे आपले संत महापुरुष सांगून गेलेत पण स्वच्छता अभियान राबविण्यात रावेर न पा कुठेतरी कमी या ठाकुर ठेकेदारामुळे पडते हे चित्र स्पष्ट दिसते.
रावेर च्या नागरिकांचं असंही म्हणणं आहे की जर ठेकेदार योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात कमी पडत असेल तर त्याला त्याचे पेमेंट नगरपालिका रावेर ने देऊ नये आणि याला व्यवस्थित काम करीत नसल्याने ह्याचा ठेका त्वरित काढून घेण्यात यावा अशी रावेर वाशीयांची इच्छा आहे कारण याच्या जागी दुसरा ठेकेदार चांगले काम करेल आणि याचा ठेका रद्द केल्या मुळे येणाऱ्या ठेकेदारावर एक प्रकार चा दबाव असेल, म्हणून मुख्या धिकारी मॅडम यांनी ठेजकेदारावर कारवाई करावी आणि आपल्या कर्तव्य दक्षतेचा परिचय नागरिकांना द्यावा.
आता नागरिकांचे डोळे मुख्यअधिकारी मॅडम काय कारवाई करतात आणि ठेकेदाराचा समाचार कसा घेतात या कडे लागले आहेत तरी रावेर शहरातील शौचालयांची दररोज साफसफाई होईल अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत