सहारा दूध डेअरीच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा मृत्यू, चार कामगार गंभीर जखमी
सहारा दूध डेअरीच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा मृत्यू, चार कामगार गंभीर जखमी
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,रोहिदास उतळे, चाकण : चिंबळी फाटा (ता. खेड) येथील सहारा दूध डेअरीमधील बॉयलरची सफाई करताना निष्काळजीपणा केल्याने बॉयलरमधील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले. त्यात चार कामगार गंभीर भाजले असून त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाळुंगे चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली. मुकेश रामलाई कश्यप ( वय ३० वर्षे ) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. सोनू श्रीप्रभूदयाल कश्यप (वय.२६ वर्षे), राहुल संतोष कुमार माथूर (वय. १८ वर्षे ), इसाक अकबर कोतवाल (वय ४५ वर्षे सर्व रा. चिंबळी फाटा ) अशी या घटनेत भाजून गंभीर जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.
या घटनेप्रकरणी सहारा दूध डेअरी येथील ऑपरेटर अब्दुल गफार अब्दुल रशीद मुल्ला (वय ४४ वर्षे रा. कलागोडवस्ती, धानोरी, पुणे) आणि व्यवस्थापक मोहितकुमार राजबहादूर सिंग (वय.५५ वर्षे रा. कुरुळी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत