Breaking News

बोदवड रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळण्यासाठी राष्ट्रीय विकलांग पार्टीचे डिआरएम यांना निवेदन...

 

बोदवड रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळण्यासाठी राष्ट्रीय विकलांग पार्टीचे डिआरएम यांना निवेदन...

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, जितेंद्र गायकवाड, बोदवड : कोरोना विषाणूच्या संक्रमणानंतर बंद झालेल्या गाड्या रेल्वे स्थानकावर अद्यापही सुरु न झाल्याने राष्ट्रीय विकलांग पार्टीतर्फे अपर डी.आर.एम रुकमैय्या मीना यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. बोदवड रेल्वे स्थानकावर शालिमार एक्सप्रेस ,  सेवाग्राम एक्सप्रेस , सूरत अमरावती सुपरफास्ट पॅसेंजर , वर्धा भुसावळ पॅसेंजर व नरखेड-भुसावळ पॅसेंजर 

या सर्व गाड्यांना थांबा रेल्वे स्टेशनला होता. परंतु ,  मार्च 2020 ला कोरोना विषाणूने हैदोस घातल्यानंतर सद्यस्थितीत परिस्थितीत आटोक्यात आल्यानंतर ही रेल्वे गाड्या पूर्वपदावर आलेल्या नाही. सदरील गाड्या सुरु झाल्या असल्या तरी रेल्वे स्थानकावर अजुनही थांबा मिळाला नाहि. त्यामुळे तालुक्यातील 700 विकलांग बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षाचालक , टांगाचालक, व्यापारी , विद्यार्थी यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 रेल्वे स्थानकावर गाड्या पूर्वपदावर आणण्यात याव्या अशी मागणी राष्ट्रीय विकलांग पार्टीकडून अपर डी.आर.एम रुकमैय्या मीना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय विकलांग पार्टी प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड ,  बोदवड तालुका अध्यक्ष प्रविण वंजारी , शहराध्यक्ष श्यामलाल लुड , भुसावळ तालुका अध्यक्ष श्याम राजपूत यांच्यासमवेत अन्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत