नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कारवाई करून अटक करा : बोदवड येथे मुस्लीम समाजाची मागणी !
नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कारवाई करून अटक करा :बोदवड येथे मुस्लीम समाजाची मागणी!
महा घडामोडी न्युज नेटवर्क,जळगाव : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ)साहेब यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्या नूपुर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी आज बोदवड येथील मुस्लिम समाजाने बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुंजाळ साहेब यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदय यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) साहेब यांच्या विषयी अपशब्द वापरले. यामुळे संपूर्ण जगातील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे नुपुर शर्मा यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे हाफिज फिरोज,नईम खान बागवान,माजी नगरसेवक इरफान शेख,तौसिफ पिंजारी,हाफिज हकीम,सैय्यद अदनान,अय्युब बागवान,हाफिज शोहेब,तास्लिम पिंजारी ई.उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत