सेलूत चोरट्याचा धुमाकूळ पाच तोळ्यांचे मंगळसुत्र पळवले
सेलूत चोरट्याचा धुमाकूळ पाच तोळ्यांचे मंगळसुत्र पळवले
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे सेलू : सेलुत पाच तोळयाचे मंगळसूत्र लंपास. सेलु _ अंधाराचा फायदा घेऊन मोटार सायकल वर आलेल्या चोरटय़ांनी एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळयाचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. 10 जुन रोजी सायंकाळी सात च्या सुमारास घडलि.
सेलु शहरातील नावाडे गल्लि येथील रहिवासी शिक्षक मधुकर जोशी हे पत्नी प्रभा जोशी यांच्या सोबत फिरायला गेले होते त्यांनी बाबासाहेब महाराज यांचे दर्शन घेऊन परत येत असताना शनी मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेऊन पाठीमागून मोटार सायकल वर आलेल्या चोरटय़ांनी प्रभा जोशी यांच्या गळ्यातील पाच तोळयाचे मंगळसूत्र लंपास केले यावेळी जोशी दाम्पत्याने आरडाओरडा केलि परंतु चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले..
सेलु शहरात रस्त्यावर असलेले अनेक पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटना वाढत आहेत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत