पारनेर तालुका "भोंगामुक्त" करणार ~ अविनाश पवार
पारनेर तालुका "भोंगामुक्त" करणार ~ अविनाश पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणत्याही धर्माला विरोध नाही परंतु मशिदीवरील भोंग्याच्या ३६५ दिवस होणाऱ्या ध्वनीप्रदूषणामुळे इतरांना होणारा त्रास थांबला जावा व सर्वांना शांतता मिळावी यासाठी भोंगामुक्तीचे पत्रक वाटून कायमचा आवाज बंद करण्याचा लढा बुलंद करण्याचा सन्माननीय राजसाहेबांचा राजविचार पारनेर तालुक्यात पारनेरची मनसे पोहचवणार~ अविनाश पवार( मनसे पारनेर तालुका उपअध्यक्ष)
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,अहमदनगर ; महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला भोंग्यान विषयी लिहिलेल पञ व मांडलेली आपली भुमिका जनजागृती साठी जनतेला लिहीलेले हे पञ आज सुपा येथे मनसे चे तालुका उप अध्यक्ष अविनाश पवार यांनी सुपा गावात नागरिकांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटून देण्यात आली मशिदी वरिल अनाधिकृत भोंगे हा धार्मिक विषय नसुन सामाजिक विषय आहे व यामुळे होणारा ञास याबाबत जनजागृती मोहिमेची सुरुवात सुपा येथे करण्यात आली पञक घरो घरी जाऊन देण्यात आली.
त्यावेळी नागरिकांनी आप आपली मत व्यक्त केले कोणताही राजकीय पक्ष मतदानासाठी व आपली पोळी भाजून घेण्यासाठी या विषयाला गांभीर्याने घेत नव्हता पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी हा विषय घेतल्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले मा.राजसाहेब ठाकरे यांनी मशिदिंवरील भोंगे काढण्याबाबत जनतेला पाठविण्यात आलेल्या पत्राच्या प्रती लवकरच तालुक्याच्या विविध ठिकाणी वाटणार असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितल भोंग्याचा होत असलेला त्रास बंद झाला म्हणून अनेक नागरिकांनी राजसाहेबांचे आभार मानले.
यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के साहेब यांनी नागरिकांना कोणतीही समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने महाराष्ट्र सैनिकांना फोन करण्याचं आव्हान केले त्यापबरोबर " भोंगामुक्ती" पत्रक तालुकाभर वाटणार असल्याचे अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले,यावेळी दिलीप जाधव, अक्षय सुर्यवंशी,किरण म्हस्के सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत