अंतरराष्ट्रीय कराटे चैंपियनशिप स्पर्धेत सांगली च्या खेळाडूंचे यश
अंतरराष्ट्रीय कराटे चैंपियनशिप स्पर्धेत सांगली च्या खेळाडूंचे यश
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सांगली : काठमांडू नेपाळ येथे झालेल्या अंतरराष्ट्रीय जूनियर कराटे स्पर्धा २०२२ मध्ये ट्रेडिशनल कराटे डो एसोसिएशन ऑफ सांगली च्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन २ गोल्ड मेडल, ३ सिल्व्हर मेडल व २ ब्रॉंझ मेडल पटकावून उज्वल यश संपादन केले.
मेडल संपादन केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे गोल्ड मैडल ओम बुटाले,व अथर्व तेली, सिल्वर मेडल निशिका दबड़े, हर्षिणी मुल्ल्या (काता व कुमिते),मानसी हर्ले तर ब्रोंझ मेडल वरद नंदरेकर व प्रियंका पुजारी इ. तसेच इंडियन पात्रता फेरीमध्ये गणेश मोसलगी याला सिल्वर मेडल मिळाले.
या स्पर्धा नेपाल शीतोरियो कराटे असोसिएशन यांनी आयोजित केल्या होत्या. तसेच ७५० ते ८०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक हमजेखान मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत