Breaking News

रावेर नगर पालिकाच्या प्रभारीराजमुळे नागरिक हैराण

 

रावेर नगर पालिकाच्या प्रभारीराजमुळे नागरिक हैराण

मागील पाच वर्षांपासून प्रभारीराजचे संकट उभे

सॅनिटरी इंस्पेक्टर, मुख्याधीकारी,सहाय्यक लेखा पाल ,आणि बांधकाम इंजिनीअर महत्वाचे शासकीय अधिकारी प्रभारी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : गेल्या पाच वर्षांपासून रावेर नगर पालिकेला प्रभारी राज चा रोग लागलेला आहे, तो कोणत्याही प्रकारच्या औषधाने बरा व्हायला तयार दिसत नाही, त्यामुळे रावेर चे नागरिक हैराण झाले आहेत. 

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जेव्हा केव्हाही नागरिक समस्या घेऊन नगर पालिकेत जातात तेव्हा येथे मुख्याधिकारी, सॅनिटरी इन्स्पेक्टर, सहाय्यक लेखापाल आणि बांधकाम अभियंता नसतोच, आणि रावेर न पा कर्मचारी पण प्रभारी राज ने पढवून ठेवलेत ,ते नेहमीच सांगतात आज साहेब नाहीत उद्या परवा या. मग त्रासून नागरिक माघारी फिरतात ,अश्या प्रकारे काम काही होत नाही आणि वरील चारही प्रशासनातील जबाबदार पदाधिकारी आहेत. हा अधिकारी वर्गच जर प्रभारी असेल तर जनतेची कामे करेल कोण?असा प्रश्न उपस्थित होतो.

   रावेर नगर पालिकेने हा प्रभारी राज चा प्रकार पाच वर्षापासून सुरू ठेवलेला आहे, प्रभारी राज असल्याने संबंधित अधिकारी वर्गाचे वजन पडत नाही, याउलट परिस्थिती अशी आहे की हे अधिकारी दुसऱ्या न पा चा त्यांचा कारभार सांभाळून रावेर ला आठवड्यात एक दोनदाच येतात आणि सर्व कामे घाई घाईत करून मोकळे होतात. यामुळे जनतेची कोणतीच कामे नव्हता उलट निराशाजनक परिस्थितीचा सामना करावा लागतो, ही खेदाची बाब आहे.

  रावेर च्या नागरिकांना अपेक्षा आहे की लवकरच हे प्रभारी राज चे भयानक संकट समाप्त होऊन जनतेचा व त्यांच्या समस्यांचा पाढा लवकरच सुटेल परंतु प्रभारी राज मुळे हे शक्य नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पद आरोग्य निरीक्षक आहे परंतु हे सुद्धा प्रभारी असल्याने खूपच मोठ्या समस्या तयार झालेल्या आहेत, मच्छर डास फवारणी नाही स्वच्छ भारत मिशन नावपुरतेच आहे.रस्ता डांबरीकरणाचे काम सुद्धा ठेकेदार त्याच्या मनमानी प्रमाणे करुन मोकळा होतो अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम जनतेच्या माथी मारले जाते ,कुणावरच कुणाचाही वचक रावेर न पा मध्ये राहिलेला नाही याला कारण फक्त नी फक्त प्रभारी राज!

   रावेर न पा प्रभारी राज संपवा. लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवा .कायम स्वरूपी अधिकाऱ्यांची सोय करण्यात यावी म्हणजे प्रभारी राज नको आणि उडवा उडविची उत्तरे थांबवा अशी जनतेची मागणी आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत