Breaking News

सरस्वती विद्या मंदिर (माध्यमिक) रावेर शाळेत १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 सरस्वती विद्या मंदिर (माध्यमिक) रावेर शाळेत १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,जळगांव : रावेर येथील श्री शिव प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक रावेर या शाळेत आज मार्च 22 मध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्राथमिक शाळेचे मुख्या.श्री राजकुमार जैन सर माध्यमिक शाळेचे मुख्यl. श्री.मोहन बारी सर व संस्था व्यवस्थापक श्री विकास पाटील सर यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.

सूत्रसंचालन श्री.नितीन पाठक सर यांनी केले. सर्व प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थांचे तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत प्रत्येकाला गुलाबपुष्प देवून व पेढा भरवून करण्यात आले. विकास पाटील सर व मोहन बारी सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत