Breaking News

राजीव गांधी चौक ते नागपूर नाका या रोडवरील जड वाहतूक बंद करा

 राजीव गांधी चौक ते नागपूर नाका या रोडवरील जड वाहतूक बंद करा 

ट्रॅफिक पोलीस पोलिस तैनात करण्यात यावे 

सम्राट अशोक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य अधिकारी नगर परिषद यांना निवेदन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम,भंडारा : सम्राट अशोक सेनेच्या वतीने आज दिनांक 22 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना सम्राट अशोक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,राजीव गांधी चौक ते नागपूर रोड वरून जाणारी वाहतूक बंद करून राजीव गांधी चौकात ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात यावेत. तकिया वार्डातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाक्याकडे जाणारा जुना सिंगल रोड असून अरुंद आहे या मार्गांचे दोन्ही बाजूला घरे दुकाने आणि महत्त्वाचे म्हणजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे.

 त्यामुळे सदर मार्गाने फोर व्हीलर टू व्हीलर टॅक्सी यांची खूपच रहदारी आहे दुसरी महत्त्वाची म्हणजे रेती वाहून नेणारे ट्रक पहाटेपासून ह्याच मार्गाने नागपूर कडे जातात तसेच नागपूर कडून येणारे हेवी ट्रक याच मार्गाने येतात रस्ता अरुंद असल्याने पैदल चालणाऱ्या व्यक्तींना ट्रक कार तसेच मोटरसायकली पासून धोक्याचे झाले आहे मागील आठ दिवसापूर्वी राजीव गांधी चौकात मोटरसायकल ने जात असलेल्या पोलीस हवालदाराच्या अपघाती मृत्यू झाला आहे.

 राजीव गांधी चौकात पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिणेकडील भागातून येणारे आठ रस्त्यांच्या संगम झाला असल्याने रस्ता ओलांडणे फारच धोक्याचे असून केव्हा आणि कशा प्रकारे आपला अपघात होईल ते सांगता येत नाही एकंदरीत राजीव गांधी चौक आणि राजीव गांधी चौक ते नागपूर नाका मार्गाने जीवनाच्या दृष्टीने धोकादायक झालेला आहे राजीव गांधी चौक ते तकिया वार्ड येथे ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात यावे, राजीव गांधी चौ ते नागपूर कडे जाणारा तसेच नागपूर नाका ते राजीव गांधी चौकाकडे येणाऱ्या रहदारीसाठी मनाई करण्यात यावी,

राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंत रुंद डबल रोड झालेला आहे तेव्हा या मार्गे जड वाहनांची रहदारी वळविल्यास अपघात टाळण्याच्या दृष्टीने अधिक सोयीचे होईल .त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन वरील समस्यांचे निराकरण करावे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांना देण्यात आले निवेदन देताना सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम, सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजीव भांबोरे ,भंडारा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुखदेवे ,शशिकांत देशभ्रतार, अंकुश गोसेवाडे ,अरविंद गजभिये ,भारत पाटील ,प्रशांत मेश्राम, महेंद्र मेश्राम ,उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत