व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पड़द्याआड़ : रविंद्र भागवत
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन
हजारो चाहत्यांनी दिला साश्रुनयनांनी निरोप
व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पड़द्याआड़ : रविंद्र भागवत
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांना आज येथील शांतिधाम मोक्ष घाटावर मंत्राग्नि देवून अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार,सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ संदीप मुनगंटीवार यांनी मंत्राग्नि दिला. त्यावेळी अभूतपूर्व जनसागर लोटला होता.
डॉ सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दिनांक ३ जुन रोजी हृदय विकाराने नागपूर येथील किंग्ज वे रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता कळतात राज्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांकडून मुनगंटीवार परिवाराचे सांत्वन करण्यात आले.
त्यांंच्या अंतिम दर्शनास राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक आवर्जून उपस्थित होते. प्रामुख्याने चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय वडेटटीवार, खासदार सुरेश धानोरकर , माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर , माजी मंत्री शोभाताई फडणवीस , आ. चंद्रशेखर बावनकुले, आ. अशोक उइके,
आ. संजीव रेड्डी , आ. पंकज भोयर , आ. समीर कुणावार , माजी खासदार नरेश पुगलिया , खा अशोक नेते, खा. रामदास तडस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकारे ,आ. किशोर जोरगेवार , आ देवराव होळी , भाजपचे ज्येष्ठ चंदनसिंह चंदेल , माजी आमदार अतुल देशकर , संजय धोटे , प्रा अनिल सोले , डॉ उपेंद्र कोठेकर , अरविंद शहापूरकर , माजी नगराध्यक्ष राखी कंचर्लावार , डॉ सुरेश महाकुलकर , राहुल पुंगलिया , रामु तिवारी , विनोद दत्तात्रेय , दीपक जयस्वाल , राजीव कक्कड़ , देवराव भोंगळे , डॉ मंगेश गुलवाड़े , राजेंद्र गांधी,राहुल पावडे,हरीश शर्मा , अलका आत्राम , नंदू रणदिवे आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिची उपस्थिति होती.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर रा. स्व. संघाचे नगर संघचालक रविंद्र भागवत यांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली. डॉ. मुनगंटीवार यांच्या निधनाने व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे संघकार्य प्रत्येक स्वयंसेवकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी होते असेही रविंद भागवत म्हणाले.
तळपता सूर्य मावळला, लोकनेते आ.मुनगंटीवारांचे पितृछत्र हरपले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे काल शुक्रवारला( 3 जुन) रोजी सायं.7.14 वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या मृत्यमुळे एक तळपता सूर्य मावळला आहे.
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्युसमयी 91वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदा-या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या.
अत्यन्त शिस्तप्रिय व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉ.मुनगंटीवार अनेकांसाठी प्रेरणास्थान तर होतेच त्यातच त्यांचा स्वाभिमानी व सहज स्वभाव नेहमीच चर्चेत राहिला.साधी राहणी उच्च विचारसरणीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व.डॉ मुनगंटीवार.दुसऱ्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने उजळणे,असाच त्यांचा जीवन प्रवास.सर्वांना ऊर्जा देणारा हा तळपता सूर्य आता मावळला आहे.विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव. स्व.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या मृतात्म्यास ईश्वर सदगती प्रदान करो व समस्त मुनगंटीवार परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो.हीच प्रार्थना. - डॉ.मंगेश गुलवाडे,जिल्हाध्यक्ष,भजपा,महानगर,चंद्रपूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत