अवघ्या पाच तासांत नदीवरील बंधाऱ्याचे गेट चोरणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नदीवरील बंधाऱ्याचे गेट चोरणारे आरोपी अवघ्या पाच तासांत खरांगणा पोलीसांच्या जाळ्यात
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,वर्धा ; दिनांक १३-०५-२०२२ रोजी पोलीस स्टेशन खरांगणा हद्दीतील आंजी (मोठी) लगतच्या नरसुला गावाजवळ नदीचे पाणी अडविण्यासाठी असलेल्या बंधाऱ्याचे १३ लोखंडी गेट ज्यांची किंमत ५३,०००/- रु. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांनी •खरांगणा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन खरांगणा येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून तातडीने तपासाची चक्रे फिरवून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी १) चेतन विठ्ठल पिपळे, २) कौशल पुरुषोत्तम लटारे, दोघेही रा. येळाकेळी, ३) मोहम्मद जमालुद्दीन शेख सराफत अली शेख, रा. कारला चौक, वर्धा, ४) मोहम्मद नदीम शेख, रा. नागपूर या चौघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एमएच-३२/एजे-३५४४ क्रमांकाच्या मालवाहू वाहनासह लोखंडी गेट व ५ जुनी वापरती मोटारपंप असा एकूण ६,२३,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणला. सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्री पाटील यांचे मार्गदर्शनात ठाणेदार, पोलीस स्टेशन खरांगणा श्री संतोष शेगावकर यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राहुल सूर्यवंशी तसेच पोलीस अंमलदार विनोद सानप, संतोष कामडी, गिरीष चंदनखेडे, शेख अशफाक, किशोर बमनोटे यांनी केली. ,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत