Breaking News

पाय घसरून विहिरीत पडल्याने त्या चिमुकलिचा दुर्दैवी मृत्यू

 

पाय घसरून विहिरीत पडल्याने त्या चिमुकलिचा दुर्दैवी मृत्यू 

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,चंद्रकांत भवारी,आंबेगाव : बकऱ्या चारायला आई-वडिलांसोबत शेतात गेलेली जिजा खेळत असताना अचानक पाय घसरून विहिरीत पडली आणि त्या चीमुकलिला आपलं जीव गमवावा लागला . ही घटना काल दुपारी तीन वाजताच्या दरम्यान किरवे यांच्या शेतात संतोष दगडे यांचा वाडा आला असून गेली आठ दिवस त्या शेतात बकऱ्या चारण्याकरिता ते थांबले आहेत. त्याच शेतात किरवे यांची विहिर सुद्धा आहे, हे दुर्दैवी घटना जिजा च्या बाबांसोबत आजोबांनी गावातील सरपंच पाटील व ग्रामस्थांना कळविले पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान बाहेर काढण्यात आला,पुढील तपास मंचर पोलीस्टेनचे सह पोलीस निरीक्षक भालेकर व त्यांचे सहकारी करत आहे.

आच्यानक काळाने घातला घाला जिजा संतोष दगडे ही धनगर समाजातील मुलगी वय वर्ष सहा ही काल दुपारी 3 वाजता आंबेगाव तालुक्यात निरगुडसर येथे  किरवे यांच्या शेतात त्याचा वाडा आला आसुन ते गेली आठ दिवस त्या शेतात आपल्या आई वडीलांच्या सोबत बकर चारत  आसताना. त्या शेताच्या कडेला  विहीर आसुन त्या विहीरीच्या कडेला  खेळत आणताना  आच्यानक पाय घसरून ति विहीरीत  पडली व चिमुकलीला आपला जिव गमवावा लागला . ही दुर्दैवी घटना तिच्या वडीलांनी व आजोबानी गावातील सरपंच पाटील व ग्रामस्थांना कळविले व आज दि 5 6 2022 रोजी पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने म्रुत देह सायंकाळी 6वाजता बाहेर काढण्यात आला ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत