लोकनेते नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक पवन मस्के यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती दिली भेट
लोकनेते नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक पवन मस्के यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती दिली भेट
भंडारा : जिल्ह्याचे भुमीपुत्र व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव जनसेवक श्री. पवन मस्के यांनी आमदार नाना पटोले यांच्या निवासस्थानी सुकळी येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली. तसेच केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाना पटोले यांचे निकटवर्तीय जनसेवक पवन मस्के यांनी नाना पटोले यांना मिठाई भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व भविष्यात अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
आज रविवार ०५ जून रोजी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. साकोली तालुक्यातील सुकळी हे आमदार नाना पटोले यांचे स्वगांव असल्याने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनसेवक पवन मस्के यांनी त्यांची भेट घेतली. व त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.सोबत पवन मस्के , लूकेश जोध सुमित मडामे मोणू शेंडे सौरभ साखरकर चिराग गुरनुले सचिन साखरकर मोहित मडामे आदी कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत