Breaking News

दानशूर व्यक्तिमत्व गणपतराव नखाते यांचा सत्कार सोहळा संपन्न

 दानशूर व्यक्तिमत्व गणपतराव नखाते यांचा सत्कार सोहळा संपन्न

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,बालाजी सुवर्णकार, उदगीर : उदगीर येथील ज्येष्ठ समाज बांधव तथा सुवर्णकार समाजाचे मार्गदर्शक गणपतराव नखाते यांनी उदगीर येथील आयटीआय समोरील त्यांच्या जागेत संत नरहरी महाराज यांच्या मंदिर बांधकामासाठी एक गुंठा जमीन दिल्या बद्दल संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर व संत नरहरी महाराज दैवज्ञ युवक संघ उदगीर च्या वतीने गणपतराव नखाते सौ.शारदा नखाते व अमोल नखाते यांचा सत्कार संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र रत्नपारखी कार्यकारिणी सदस्य गणेश केजकर यांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या जीवनावरील रिंगण हा विशेषांक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या सत्कार सोहळ्यात नंतर मंदिर बांधकामाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांनी दिलेल्या जागेवर संत नरहरी महाराज यांचे देगलूर रोड वरील जागेत त्यांनी सुंदर असे मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे सचिव बालाजी सुवर्णकार सहसचिव एकनाथ रत्नपारखी कार्यकारिणी सदस्य अजय पंडित दामोदर सुवर्णकार प्रभाकर सुवर्णकार संतोष नखाते विष्णू पारडे व संत नरहरी महाराज दैवज्ञ युवक मंडळाचे पदाधिकारी अच्युत पंडित भागवत पोद्दार विनोद पेचफुले जनक सुवर्णकार योगेश भोकरे संभाजी पंडित लक्ष्मीकांत नखाते सुधाकर सुवर्णकार शुभम जडीतकर आकाश पोद्दार गणेश सोनटक्‍के विनायक सोनटक्के इंजिनिअर विष्णुदास सुवर्णकार हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बालाजी बालाजी सुवर्णकार यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत