Breaking News

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची आज गरज-विजय राठोड

 राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची आज गरज-विजय राठोड

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,बालाजी सुवर्णकार, उदगीर : राजर्षी शाहू महाराज हे दिन दलितांचे कैवारी नव्हते तर ते सर्व समाजाचे हितचिंतक होते असे मत शिक्षक तथा संस्थाचालक विजय राठोड यांनी व्यक्त केले ते व्यंकटेश नगर व कानमंदे नगरीतील संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राजषी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी सुधाकर मोहीते होते विजय राठोड पुढे म्हणाले.

 या सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आता राजषी शाहू महाराजांचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले या जयंती सोहळ्याप्रसंगी डॉक्टर अजय कुलकर्णी शिक्षक लक्ष्मण दापकेकर प्रशांत डोंगळीकर व जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पत संस्थेचे व्हाईस चेअरमन अरविंद धनुरे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुधाकर मोहिते व प्रमुख पाहुणे विजय राठोड यांचा पुष्पहार महत्मा ज्योतिबा फुले ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.

 या जयंती कार्यक्रमास अनिरुद्ध रणसुभे नरसिंह भगवे विजय कुमार जाधव प्रफुल रणसुभे यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्या साठी अरविंद धनुरे व मुख्य संयोजक बालाजी सुवर्णकार यांनी घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद धनुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी सुवर्णकार यांनी केले.

सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी उदगीर प्रतिनिधी संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर द्वारा संचलित असलेल्या सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर येथे राजषीऀ शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार यांनी राजषीऀ शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले या जयंती प्रसंगी टीचर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे मुख्य ॲडमिन बालाजी सुवर्णकार , सुवर्णकार माउली, पार्थ सुवर्णकार व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी जयश्री बेलुरे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत