Breaking News

रावेर येथील आठवडे बाजार व महात्मा फुले कॉम्प्लेक्स लेडीज टॉयलेट्स ,सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था

 रावेर येथील आठवडे बाजार व महात्मा फुले कॉम्प्लेक्स लेडीज टॉयलेट्स ,सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था

ठेकेदार ठाकूर कडून जनतेच्या पैशाची लूट

 20 ते 21 रु प्रति शौचालय शासनाकडून स्वच्छतेच्या नावावर,मात्र काम झिरो

रोजच घाण मैला तसाच पडून, स्वच्छता मुळीच नाही

रावेरच्या सीओ मॅडम लक्ष का घालत नाही

प्रभारी राज चा नागरिकांना त्रास, दुर्गंधी युक्त वातावरणाने नागरिक बालक आजारी पडण्याची दाट शक्यता

गॅस्ट्रो डायरीया सारख्या आजारांची लागण होण्याची जेष्ठ नागरिकांना व बालकांना शक्यता

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,जळगांव : रावेर येथील महात्मा फुले कॉम्प्लेक्स जवळील लेडीज टॉयलेट्स आणि आठवडे बाजार एरियात न पा रावेर च्या सार्वजनिक शौचालय आहेत परंतु या शौचालयाचे स्वच्छतेचे काम हे ठाकूर नामक एका बदमाश ठेकेदाराचे आहे. या ठाकूर ने कोणत्याही प्रकारची स्वच्छता या ठिकाणी ठेवलेली नसून उलट शौचालयात मैला व घाण मोठया प्रमाणावर दिसत आहे.


 संबंधित ठेकेदाराशी मोबाईल च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले असता तो उडवा उडवीचे उत्तर देऊन जुमानत नाही कारण याच्या वर रावेर येथील नगरपालिका प्रशासनाचा काहीही ताबा नियंत्रण नाही. आणि याच मिळणाऱ्या सुट मुळे हा ठेकेदार मनमानी कारभार करत असून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. झोपलेली नगरपालिका रावेर डोळे उघडायला तयार नाही. रावेर नगर पालिकेने या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले पाहिजे परंतु जाणून बुजुन दुर्लक्ष होतांना दिसत आहे.


 सद्या कोरोनाची चवथी लाट येईल असे बोलले जात आहे आणि अश्या साथीच्या काळात स्वच्छतेला नगर पालिका रावेर लक्ष का देत नाही याउलट नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा अशी आहे की ठेकेदार व न पा रावेर यांचे काही चिरीमिरी चे गोड बंगाल तर नाही कारण तक्रारी केल्यावर सुद्धा काहीही ऍक्शन घेताना न पा रावेर दिसत नाही,

 याच कारणाने ठाकूर ठेकेदार कुणालाही घाबरत नाही म्हणून कामात कसूर दिसून येतो आणि अश्या काम न करणाऱ्या ठेकेदारास न पा रावेर काम पुन्हा देणार आहे का हा मुद्दा येथे महत्वाचा आहे ,जबाबदारी न स्वीकारता उडवा उडवीचे उत्तरं देणाऱ्या आणि जनतेच्या आरोग्या शी खेळणाऱ्या बेजबाबदार ठेकेदाराची कान उघडणी होऊन त्याचे डोके भानावर रावेर नगर पालिकेने आणले पाहिजे.

 सदर च्या एरियात नेहमी घाणीचे साम्राज्य पसरलेले असते पण हा ठाकूर नामक ठेकेदार तिकडे लक्ष चं देत नाही आणि एका शौचालयाचे 20 ते 21 रुपये प्रति शौचालय स्वच्छतेचे तो घेतो ,जवळ जवळ 20 ते 30 शौचालयाची स्वच्छता याच्या कडे असून हा ठेकेदार जवळपास महिन्याला 20 ते 30 हजार रुपये कमावतो परंतु स्वच्छता या भागातील शौचालयांमध्ये कधीही नसते ,

वरिल प्रमाणे पैसे स्वच्छता च्या नावावर घेऊन हा ठेकेदार शासनाच्या पैशाची नगर पालिकेच्या आशीर्वादाने गिळंकृत करत आहे या प्रकरणी शासनाने लक्ष वेधून नाहक लोक गॅस्ट्रो डायरिया सारख्या आजाराने दगावणार नाही याची त्वरित दक्षता घेणे गरजेचे आहे अन्यथा रावेर शहरात या साथीच्या रोगांनी थैमान घातले असेल याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत