Breaking News

धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांची मागणी

 धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांची मागणी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम,भंडारा : खरीप पणन हंगाम सन २०२१-२२ मध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या उन्हाळी धानाची मर्यादा केंद्र शासनाकडून वाढवून उन्हाळी धान उत्पादन शेतकऱ्याचा संपूर्ण धान खरेदी करण्याबाबत व दिनांक ७-६-२०२२ला सुरू झालेली खरेदी अचानक १०-६-२०२२ला बंद झाली ती त्वरित सुरू करण्याबाबत,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य,मा. छगन भुजबळ साहेब,यांना आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी निवेदन देऊन त्वरित सुरू करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी बांधकाम सभापती श्री विनायक बुरडे,पवनी तालुका अध्यक्ष लोमेष वैद्य, मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, जिल्हापरिषद सदस्य महादेव पचघरे, जिल्हापरिषद सदस्य नरेश ईश्वरकर, बाळाभाऊ समरीत, यासिन छवारे, हुसेन, ढबाले व अन्य शिष्टमंडळ मंडळ भेट झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत