रावेर मतदार यादी सुटसुटतपणा सोपी करावी मंगल कार्यालयात सुविधा मिळण्यासाठी प्रशांत बोरकर यांची नपा प्रशासनाची चर्चा
रावेर मतदार यादी सुटसुटतपणा सोपी करावी मंगल कार्यालयात सुविधा मिळण्यासाठी प्रशांत बोरकर यांची नपा प्रशासनाची चर्चा
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,जळगांव : रावेर शहरातील मंगल कार्यालयात आवश्यक सुविधा उपलबध करून द्या, तसेच मतदार यादी अद्ययावत आणि सुटसुटीत करावी, अशी मागणी रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मालेगावे मेडंम यांचे कडे करून त्याचेशी चर्चा केली त्यांनी याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
रावेर येथील मंगल कार्यालयात आवश्यक अश्या सुविधा नसून पाण्याची तसेच वीज उपलबध नाही तसेच साफसफाई सह कर्मचारी तैनात करावे तसेच गरीब कार्यकर्ते आणि पत्रकार यांना सवलती चे दराने मंगल कार्यालय ऊपलब्ध करून द्यावे शहरात अनेक ठिकाणी विद्यार्थी यांचे साठी अभ्यासिका. महिलेसाठी सुलभ शोच्यालय मुताऱ्या स्वच्छ्ता गृह करण्यात यावेत अश्या अनेक मगण्या केल्या .तसेच नवीन होवू घातलेत्या निवडणुका संदर्भात ज्या याध्या आहेत त्यात प्रचंड घोळ झाला असून त्या सुटसुटीत करावी आणि ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करावी अशी अपेक्षा यावेळी केली त्यात त्यासंदर्भात नवीन याद्या प्रसिद्ध करतांना सूचनांचे विचार करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
मंगल कार्यालयात योग्य त्या सुविधा साठींही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे श्री प्रशांत बोरकर यांनी पत्रकार यांचेशी बोलतांना सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत