कोविड सेंटरला लोकांनी दिलेल्या पैशांचा हिशोब दया~अविनाश पवार
कोविड सेंटरला लोकांनी दिलेल्या पैशांचा हिशोब दया~अविनाश पवार
"पारनेर बंद"म्हणजे चमकोगिरीच्या आडून दहशत करणाऱ्यांना पारनेरच्या जनतेचा घरचा आहेर~ पवार
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,अहमदनगर : सध्या पारनेर तालुक्यातील पारनेर शहरात एक विषय जोर धरू लागला आहे खाजगी प्रतिष्ठान ५०० बेडच हाॅस्पीटल बांधनार म्हणे ऐकायला चांगल वाटते पण प्रत्यक्षात सत्य माञ वेगळंच दिसते आहे मागिल कोरोणा संकटात देश सापडला असताना पारनेर तालुक्यात प्रशासनाच्या वतीने ११०० बेडच कोव्हीड सेंटर तयार करण्यात आले व स्वच्छतेचा व जेवण पुरविण्याचा ठेका फक्त नीलेश लंके प्रतिष्ठान ला देण्यात आला हे स्वतः तहसीलदार यांनी माहिती अधिकारात स्पष्ट पणे सांगितले आहे पण खाजगी प्रतिष्ठान मार्फत प्रशासकीय अधिकारी वर्गावर दहशत निर्माण करुन सर्व आम्हीच करतो आहे.
असा गाजा वाजा करुन एक वेगळं चित्र निर्माण करण्यात आले व शरदचंद्र पवार कोव्हीड सेंटच्या नावाने पारनेर तालुक्यातुनच नव्हे तर परदेशातुन देणग्या गोळा करण्यात आल्या तसेच मोठ्या प्रमाणावर वस्तू सह धान्य साठा गोळा करण्यात आला हे तालुक्यातील सर्व सामान्य गोरगरीब जनतेनी विश्वास ठेवून लोकप्रतिनिधी नात्याने राजकारण विरहित विरोधकांन सह सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली पण प्रत्यक्षात चिञ माञ वेगळंच निर्माण केल गेलं.
तालुक्यातील जनता संकटात असताना गलिच्छ राज कारण करुन प्रशासकीय यंत्रणे वर दडपशाहीकरुन स्वतः च्या प्रसिद्धी साठी कोरोणा सेंटर मध्ये अनाधिकृत कार्यक्रम आयोजित करुन धिगांना घालण्यात आला पुढे अधिकारी तहसीलदार वर्गाचा उद्रेंक तसेच आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णांलयातील घटना एवढे होऊन सुद्धा नशा वाढतच गेली पारनेर तालुक्यातील जनतेचा कुणाची आई,कुणाचे वडील,कुणाचा,भाऊ, कुणाचा नवरा मरण पावला कुटुंब ची कुटुंब उध्वस्त होत असतानः भावणीक लोकांच्या भावनेची कदर न करता ह्याच प्रतिष्ठान चे महाशय फक्त आणि फक्त चमकोगीरी करुण स्वतःची प्रसिद्धी करण्याचा केविलवाणा प्रयत्नच नव्हे तर आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतय.
यांनी कोव्हीड सेंटर मध्ये काय काय उद्योग केले हे तालुक्यातील जनता पहात होती खाजगी प्रतिष्ठान ची मजल सरकारी कोव्हीड सेंटर मध्ये स्वतःचा पिक्चर बनविण्या पर्यंत गेली त्यामुळेच पारनेर मधील जनतेला नव्हे तर पुर्ण तालुक्यातील जनतेला यांच्या वर विश्वास राहिलेला नाही म्हणून लोक जाहीर पणे विरोधात बोलायला सुरुवात केली असता लक्ष विचलित करण्यासाठी वेग वेगवेगळ्या गोष्टीचे जादुचे प्रयोग करून भुलविण्यासाठी प्रयत्न चालु आहेत पण यांनी
अगोदर प्रामाणिक पणे कोव्हीड सेंटर चा हिशोब तालुक्यातील आम जनतेला द्यावा नंतरच हाॅस्पीटल च्या नावावर प्रतिष्ठानच्या नावाने देणग्या गोळा करण्याचा धंदा चालु करावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर ची मागणी आहे या सर्व गोष्टी चा विचार करुन पारनेर करांनी पुकारलेल्या पारनेर बंद ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर जाहिर पाठिंबा देत आहे.
जर पारनेर बंद ठेवून पण यांना पारनेर करांची हक्काची जागा देण्यात आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर या गोष्टीवर बारीक नजर ठेवून वेळ पडल्यास पारनेर करांना सोबत घेऊन पारनेर करांच्या हक्कासाठी पुर्ण पारनेर तालुका बंद ची हाक देणार व तालुक्यातील दहशत युक्त दडपशाहीचा बिमोड केल्याशिवाय शांत बसणार नाही असे अविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर यांनी बोलताना सांगितले.
पारनेर तालुक्यात भाळवणी येथे उभारलेले ११००बेडच सरकारी कोव्हीड सेंटर व त्याच्या नावावर प्रतिष्ठान च्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावापासून तर परदेशातून गोळा केलेल्या पैशांचा अगोदर हिशोब द्या नंतर खाजगी हाॅस्पीटल च्या गप्पा मारा : अविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत