सुपा औद्योगिक वसाहतीने सुप्याची कचराकुंडी केली~ अविनाश पवार
सुपा औद्योगिक वसाहतीने सुप्याची कचराकुंडी केली~ अविनाश पवार
कचऱ्याची सोय लावण्यासाठी पारनेर तहसिलला निवेदन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठुबे,पारनेर : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमुळे सुपा गावाला नागरिकांसाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करणे मोठे संघर्षाचे ठरत असुन गावावर वाढत्या रहदारीमुळे गावात अस्ताव्यस्त पडलेला कचारा व त्यातच सुपा एम आय डिसी मधील कंपन्यामधील निघणारा कचरा व केमिकल युक्त सांडपाण्याच योग्य नियोजन नसल्यामुळे सुपा एमआयडीसी मधील कंपन्यांमुळे कचर्याची निर्माण झालेली समस्या यामुळे गावात घाणीच साम्राज्य नागरिकांसाठी जीवघेण बनले आहे.
गावात चालताना नाक दाबुन चालण्याची वेळे आली असुन सुपा गावाच सौंदर्य नाहीसे झाले आहे गावात अस्ताव्यस्त पडलेला कचरा त्यातच पडणारा पाऊस त्यामुळे गावात सर्वत्र दुर्गंधी सुटली असुन मच्छरांचे मोठे प्रमाण वाढले असुन गावात डेंगु,मलेरीयाची साथ आली असुन अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत यामुळे सुपा गावातील नागरिकांच आरोग्य धोक्यात आले आहे रोगराईने गावात घातलेले थैमान जीवघेणे ठरत आहे गावात कचरा संचलन करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्या कारणाणे याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाची आहेे.
गावच विद्रुप रुप निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर प्रशासणाणे अंकुश ठेवावा व कंपण्यांनी गावासाठी कायम स्वरूपाची कचरा संचलनाची त्वरीत सोय निर्माण करून द्यावी व गावासह सुपा औद्योगिक वसाहतीतील कचरा उचलावा यासाठी पारनेर तहसीलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असुन प्रशासणाणे सुप्याची कचराकुंडी करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कार्यवाही करावी,
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका सुपा गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात न्याय न मिळाल्यास मनसे स्टाईल तिव्र स्वरुपाचे आंदोलन करेल याची प्रशासणाने गांभीर्याने दखल घ्यावी काही नागरिकांच्या रोषामुळे काही अघटीत घडल्यास प्रशासण सर्वस्वी जबाबदार राहील यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी पारनेर तहसीलदारांना दिले असल्याचे बोलताना सांगितले यावेळी सतिष म्हस्के, ज्ञानदेव पवार,अक्षय सुर्यवंशी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत