Breaking News

चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे अनुदान खंडित

 चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे अनुदान खंडित

जखमी इसम अनुदानाच्या प्रतीक्षेत एक वर्ष होऊनही अनुदान काही मिळेना

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,गणेश परचाके,पोंभुर्णा : सातारा तुकूम येतील कायमचे रहिवासी श्री सिताराम मडावी वय 60 वर्ष व श्री विलास पेंढोर वय 55 वर्ष असून हे दोघेही इसम आपले स्वतःचे जनावरे राखण्याकरिता गेले असता त्यांच्यावर अस्वलीने गंभीर जखमी केले. त्याच गंभीरतेचे शासनाचे अनुदान अजूनही त्या जखमी इसमांना मिळालेले नाही.

तसेच चिचपल्ली वनपरिक्षेत्राची कसलीही माहिती त्या दोघेही इसमांना मिळालेली नाही. गेल्या एक वर्षापासून जखमी इसम आपल्या जखमी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून त्यांना कसल्याही प्रकारची माहिती न देता त्यांचे अनुदान अजून पर्यंत त्यांच्या हातात मिळेना. ते दोघेही इसम अगदी गरिबी घराण्यातले असून ते दोघेही वनपरिक्षेत्र चिचपल्ली येते दोनदा भेट देऊन त्यांची दखल कर्मचाऱ्यांनी अजूनही घेतलेली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत