बाळू फाउंडेशनतर्फे मुरमाडी येथे तीन कुपोषित बालकांना किट चे वाटप
बाळू फाउंडेशनतर्फे मुरमाडी येथे तीन कुपोषित बालकांना किट चे वाटप
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी,चंद्रपूर : सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत मुरमाडी येथील तीन कुपोषित बालकांना बाळू फाउंडेशनतर्फे पोषण आहार किट चे वाटप करण्यात आले. सिंदेवाही तालुका कुपोषण मुक्त व्हावा या दृष्टीने बाळू फाऊंडेशन सुरू केलेल्या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. मुरमाडी गावापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याबाबत बाळू फाउंडेशन चे संस्थापक श्री. अमित महाजनवार विस्तार अधिकारी यांनी कळविले.
कार्यक्रमाला मुरमाडी ग्रामपंचायतच्या सरपंच मा.सौ.रुपाली रत्नावार मॅडम,मा.श्री रणधीर दुपारे माजी पंचायत समिती सदस्य,उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कू .तन्नीरवार मॅडम,अंगणवाडी सेविका सुपरवायझर,ग्रामविकास अधिकारी मा.श्री. घरडे साहेब "बाळू फाऊंडेशनच्या" सिंदेवाही तालुक्यातील कार्याचे सारथी मा.तेजेंद्र नागदेवते,मा.सुनील गेडाम, मा.गौतम गेडाम,मा.हेमंत वाघमारे तथा ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष मा.लोणारे साहेब ऊपस्तिथ होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत