सभासदांचे हित जोपासून संस्थेची प्रगती साधा.- विक्रमसिहं कळमकर
सभासदांचे हित जोपासून संस्थेची प्रगती साधा.- विक्रमसिहं कळमकर
पाडळीतील नवनिर्वाचित चेअरमन,व्हा.चेअरमन यांचा सत्कार.
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठुबे, पारनेर : पाडळी सेवा संस्थेचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सभासदांचे हित जोपासून संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करून नावलौकिक वाढवावा, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिहं कळमकर यांनी व्यक्त केले.
पाडळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी डी.बी.आण्णा करंजुले व व्हाईस चेअरमन पदी आप्पासाहेब कळमकर यांची निवड झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.या वेळी दादाभाऊ वारे,गंगाराम कळमकर, मुकेश गवळी,दीपक करंजुले,आप्पासाहेब साठे,सुधाकर (काका) कळमकर,दौलतराव खणसे पाटील. संजय वाखारे,विठ्ठलराव साठे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत