Breaking News

स्वच्छ भारत मिशन चा उडविल्या जात आहे खुलेआम फज्जा

काय ते गंदगी,काय ती वास,काय ते दरवाजे तरीपण सार्वजनिक शौचालय एकदम ओके मधी

या सार्वजनिक शौचालयाचा कुणी वालीच नाही,ठेकेदाराला मिळाले ते आंदनात

रावेरच्या त्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था तशीच

दिलेले आश्वासन ठाकुर नामक ठेकेदाराने पाळले नाही

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दिपक तायडे,रावेर : रावेर येथे एक पंधरवडा अगोदर शौचालयांची खुप बिकट अवस्था होती, याबाबत रावेर च्या मुख्याधिकारी मालगावे यांनी ठेकेदाराची चांगली कान उघडणी केली होती, तेव्हा ठाकूर ठेकेदाराने यापुढे कोणत्याही प्रकारची तक्रार मी येऊ देणार नाही असे सांगितले खरे परंतु तो काहीही उपाय योजना करू शकला नाही आणि शौचालयांची अवस्था अजूनही बिकट स्थितीत आहे, 

याबाबत सविस्तर वृत्त असे की शौचालयांची दरवाज्याची अवस्था खराब आहे ,अति शरमेची बाब अशी आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्त्रीयांच्या शौचालयांना दरवाजे नाहीत, रंग रंगोटी नाही, दररोज स्वच्छता नाही उलट शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून स्वच्छता अभियानाचे 3 तेरा 9 अठरा वाजवले जात आहे.

 या शौचालयांच्या बाबतीत एक तिटकारा आणणारी बाब अशी आहे की ,पाऊस पडला म्हणजे स्वछता नसली तर दुर्गंधी गावभर पसरते आणि अशा प्रकारच्या घाणेरड्या वातावरणाने श्वसनाचे आजार वाढण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शौचालयांची स्वछता ही दररोज व्हायलाच हवी.कारण स्त्रियांचे आरोग्य चांगले हवे तरच त्या परिवाराची काळजी घेऊ शकतात आणि त्यांची जबाबदारी पार पाडू शकतात.अन्यथा स्त्रियांना बरेच आजार जडण्याची शक्यता आहे त्यामुळे रावेर च्या नगर पालिकेने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष वेधले पाहिजे आणि शौचालयांची स्वछता संबंधित ठेकेदाराकडून करुन घेणे गरजेचे आहे.

जर तो त्याचे काम टेंडर प्रमाणे करत नसेल तर त्याच्या कडून ठेका काढून योग्य त्या व्यक्तीला द्यायला हवा असे नागरिकांचे म्हणणे आहे परंतु नगर पालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे, कारवाई का होत नाही, का ठाकूर चे लाड पुरवले जात आहे, का ठाकूर वर कृपा दृष्टी मालगावे मॅडम ठेवत आहेत ,काय गोड बंगाल आहे ,हे समजणे कठीण आहे त्यामुळे जर योग्य ती कारवाई नाही झाली तर घाण नगर परिषद रावेर येथे टाकण्यात येईल असे आवाहन न पा रावेर ला नागरिकांनी केलेले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत