Breaking News

बेपत्ता युवतीची हत्या प्रकरणी दोघांना अटक

 बेपत्ता युवतीची हत्या प्रकरणी दोघांना अटक

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील बेपत्ता युवतीचा 7 जुलै ला ब्रह्मपुरी तालुक्यातील हरदोली वैनगंगा काठावरील  पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात  खळबळ उडाली होती  . ब्रह्मपुरी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून चंद्रपूर सायबर सेलच्या मदतीने युवतीच्या हत्यारांना चार दिवसात शोधून  अटक  केली व आरोपींवर खुनाचा  गुन्हा दाखल केला आहे तुषार उर्फ तरुण राजू बुज्जेवार , संदीप उर्फ दुर्गेश रेखालाल पटले दोघेही रा वडसा जिल्हा गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत.

  ऐश्वर्या  खोब्रागडे  युवती ही ब्रह्मपुरी शहरात किरायाच्या खोलीमध्ये राहून बेटाळा फाट्यावरील कॉलेजमध्ये  शिक्षण घेत होती ती  आगस्ट 2021 पासून बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे दिली होती  पोलिसांनी तपासा दरम्यान देसाईगंज वडसा येथून तुषार  बुज्जेवार  याला अटक केली यातील मुख्य आरोपी संदीप उ पटले रा .वडसा याचा शोध सुरू केला असता तो फरार आढळून आला.

सायबर सेल चंद्रपूरच्या च्या मदतीने  मुख्य आरोपी संदीप पटले यास वडसा जवळील वैनगंगा नदी पुलाखालून ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली असता आरोपीने युवतीची हत्या केल्याची कबुली यावेळी पोलिसांना दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस निरीक्षक अरविंद साळवे ,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिका अर्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रोशन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, पोलीस उपनिरीक्षक उपरे पोलीस हवालदार अंकुश आत्राम  सचिन बारसागडे, मुकेश गजबे, योगेश शिवणकर, विजय मैद, संदेश देवगडे, अजय यांनी केली. आरोपीवर वडसा येथे 2018 मध्ये खुणाच्या  तर गोंदिया येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत