Breaking News

भंडारा येथील अत्‍याचार प्रकरणाची सखोल चौकशी करा

 भंडारा येथील अत्‍याचार प्रकरणाची सखोल चौकशी करा

शिवसेना महिला अाघाडी व युवती सेनेच्या वतीने निषेध आंदोलन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : भंडारा- जिल्ह्यातील 35 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या सर्व नराधमांना अटक करून सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना महिला अाघाडी व युवती सेनेच्या वतीने जटपूरा गेटसमोर निषेध आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्याचार झालेल्या महिलेवर अत्याचार करणारा पहिला आरोपी अजुनही फरार आहे. या प्रकरणी अत्याचारग्रस्त महिलेला कोणत्याही प्रकारचे सहानुभूती अथवा मदत न करणाऱ्या लाखनी पोलिस स्टेशनचे अधिकारी निलंबित केले आहे. परंतू पहिला आरोपी अजुनही का पकडला गेला नाही? याबाबतीत एस आय टी गठीत केल्याचे कळते. परंतु त्याची अंमलबजावणी व पुढील तपास आणखी सखोल व्‍हावा, यासाठी पुर्व विदर्भ महिला संपर्क संघटक प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला आघाडी जिल्हा संघटिका उज्वला नलगे यांच्या नेतृत्वात जटपूरा गेटसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. या गंभीर घटनेकडे राज्‍य सरकारने सुध्दा दुर्लक्ष केलेले आहे. त्‍यामुळे यावेळी राज्‍य सरकारचा निषेध करण्यात आला.

पिडीत महिलेला शासनाकडून आर्थिक मदत मिळायला पाहिजे, SOP ः Standard Operating Producer ची अंमलबजावणी सदरील घटनेत झाली आहे का याची माहिती घेणे आवश्यक आहे. अशा केसेसमध्ये शासनाने SOP तयार केलेल्या आहेत का त्याची अंमलबजावणी झाली आहे का याची विचारणा करून जाब विचारला जावा, एसआयटी स्थापन करण्यात आली आहे त्याचे संदर्भ आणि उद्दिष्टेबाबत विचारणा करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

यावेळी युवतीसेना उपजिल्‍हा युवती अधिकारी रोहिणी विक्रांत पाटील, वर्षा कोठेकर, कूसूम उदार, संध्या जगताप, वैशाली जगताप, निशा धोंगडे, किरण जुनघरे, ज्‍याेती नळे, विद्या ठाकरे, कल्‍पना गाेरघाटे, प्रगती पडगेलवार, प्रियंका जगताप, धनश्री हेडाऊ, शारदा निर्गुडवार, गायत्री नान्‍हे, शोभा साइखेडे, श्रावणी मांडवकर, गणेश शेंडे, शेहनाह शेख शेहनशाह, अर्चना वैरागडे, सुनीता राजुरकर, मिनाक्षी गलगट, ॲड. अर्चना महाजन, सुवर्ण मुरकुटे, प्रतिभा तेलतुंबडे, कविता पडवे, योगीता बोरकुटे, विद्या काळे, उषा पिपरे, वर्षा बावणे, रोशना पुनवटकर, वैशाली लोखंडे, प्रज्ञा ठमके, संगीता थोरात, निर्मला कामडी, निर्मला नगराळे, पुष्पलता मुळे, प्रियंका जगताप आदी शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्या सदस्‍यांची मोठ्या संख्येने उपस्‍थिती होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत