Breaking News

पंचायत समिती सावली च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

 पंचायत समिती सावली च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग दर्शवावा,प्रशासक तथा गट विकास अधिकारी यांचे आवाहन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पंचायत समिती सावली, सरपंच संघटना,ग्रामसेवक संघटना व शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८/०८/२०२२ रोज गुरुवार ला ठिक सकाळी ११.०० वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती सावली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर शिबिराचे उद्घाटक मा. श्रीमती वर्षा गौरकर अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, अध्यक्ष मा. श्री. कपील कलोडे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद चंद्रपूर, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. श्याम वाखर्डे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सा. जिल्हा परिषद चंद्रपूर उपस्थित राहणार आहेत. 

"रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान " या म्हणीची जाणीव ठेवून पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या सर्व जनतेला, तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गांना असे आवाहन करण्यात येते की, दिनांक १८ ऑगस्ट रोजी होऊ घालणाऱ्या भव्य रक्तदान शिबीरात आपल्या नावाची नोंद करुन रक्तदान करावे. 

सदर कार्यक्रमास माजी पंचायत समिती पदाधिकारी तसेच आजी माजी ग्रामपंचायत सरपंच/ उपसरपंच, पदाधिकारी, तसेच पंचायत समितीचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थिती दर्शवून भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे मॅडम यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत