५ ऑगस्ट रोजी चिमूर शहरात निघणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महामोर्चा
५ ऑगस्ट रोजी चिमूर शहरात निघणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महामोर्चा
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राजु शर्मा, चिमूर : दि. ०५ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालय चिमूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महामोर्चा काढला जाणार असून १७ मागण्यांवर हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यातील पहिली मागणी.
(१) स्वातंत्र्यापासूनची चिमूर क्रांती जिल्हा व्हावा अशी जनतेची बहुप्रतीक्षीत मागणी आहे. चिमूर क्रांती जिल्हा घोषीत करून त्वरीत शहीद भुमीला न्याय द्यावा. (२) तळोधी (ता. नागभीड) व भिसी (ता. चिमूर) या अप्पर तालुका दर्जा प्राप्त गावांना तात्काळ तालुका घोषीत करावा. (३) चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर व नागभीड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून बाधीत शेतकऱ्यांना त्वरीत हेक्टरी ५० हजार रूपयांची सरसकट मदत द्यावी.(४)मोखाबर्डी कॅनलचे काम बहुतेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीनी सिचनापासून वंचीत आहे.
अपूर्ण बांधकामे युध्दपातळीवर पूर्ण करावे. अपूर्ण कॅनलच्या क्षेत्रात मागील ३० वर्षापासून पावसाचे पाणी अडून राहते त्यामुळे लगतच्या शेतीचे नुकसान होते त्या शेतकन्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.(५) अतीवृष्टीमुळे हजारो नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुची नासाडी झाली. त्या बाधीत नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत नुकसानीप्रमाणे देण्यात यावी.(६) महागाईने सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यावरील जी. एस. टी. मागे घ्यावा, स्वयंपाकाच्या गॅसची किंमत कमी करावी, व महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यावे. (७) चिमूर विधानसभा क्षेत्र ग्रामीण भाग असल्यामुळे या भागात उद्योग, कारखाने उभे करावे, स्थानिक बेरोजगार, सुशिक्षीत, प्रशिक्षीत युवकांना याच भागात हक्काचा रोजगार (नोकरी) उपलब्ध करून द्यावा, (८) अनुसुचित जाती, जमाती प्रमाणेच इतर मागासवर्गीय (OBC) वर्गातील जनतेला घरकुल प्राधान्य देण्यात यावे.
(९) अतीवृष्टीमुळे चिमूर तालुक्यातील नागभीड तालुक्यातील अनेक रस्ते खराब झालेले, पुल खचलेत,त्या रस्त्याची व पुलांची तातडीने दुरुस्ती करावी.(१०) भिसी येथे 'ग्रामिण रूग्णालय बनविण्यात यावे. त्या ग्रामिण रूग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्री व प्रशिक्षीत स्टॉफ देण्यात यावा. (११) अतीवृष्टीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीचे संकट चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर कोसळले आहे. अशा बाधीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शासनाने मोफत बियाणे पुरवावे व ते बियाणे दर्जेदार असावे. (१२) भिसी येथील पशु वैद्यकीय रुग्णालयाची श्रेणी वाढवून बांधकाम करावे.(१३) भिसी, चिमूर, नेरी या नगराच्या क्षेत्रात गावखेडेही जोडण्यात येऊन नगर पंचायत, नगर परिषद निर्माण करण्यात आल्यात.
त्यामुळे पूर्वी म. गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत शासनाच्या वतीने मिळणारी कामे बंद झाली आहे. MRGS योजने अंतर्गत शेतीचे पांदन रस्ते व इतर कामे पुन्हा सुरू करण्यात यावीत. (१४) केंद्र शासनाच्या घरकुल योजनेचा निधी थांबलेला आहे तो त्वरीत मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. (१५) धडक सिंचन योजने अंतर्गत आतापर्यंत अनेक विहिरी, शेततलाव (बोडी) बांधण्यात आल्यात अनेक कामे निधी न मिळाल्यामुळे अपूर्ण स्थितीत आहे.
त्यामुळे लाभार्थी शेतकन्यांचा अडलेला निधी तात्काळ मिळवून देण्यात यावा.(१६) राशन पूर्ववत चालू करण्याबाबत. (१७) शेतीतील विज पुरवठा नियमित सुरू ठेवण्याबाबत. चे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असून मागणी केलेल्या पूर्ण मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्या या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महामोर्चा निघणार असून,या महामोर्चा ला प्रामुख्याने उपस्थित म्हनून प्राजक्त तनपुरे माजी राज्यमंत्री,अमोल मिटकरी आमदार तथा विधान परिषद सदस्य,मनोहर चंद्रिकापुरे प्रदेश प्रतिनिधी , विद्रोही तसेच आदी नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
याबाबत ची पत्रकार परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या विश्राम गृह याठिकाणी घेण्यात आली.यावेळी राजेंद्र वैध राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष , माजी अध्यक्ष मोरेश्वरजी टेंभुडे , श्रीनिवास शेरकी जिल्हा अध्यक्ष , अंरविद रेवतकर जिल्हा सरचिटणीस , रघुनाथ बोरकर विधानसभा अध्यक्ष राजू मुरकुटे , तालुका अध्यक्ष विनोद नवघडे , नागभीड तालुका अध्यक्ष रमेश करारे , जिल्हा सरचिटणीस आनंद अडवले , जिल्हा सरचिटणीस रामू चौधरी, राहुल राणे, विठ्ठल पैंदाम, किशोर गभने ,बाळू पाटील ठाकरे, अहमद शेख,अमृत बन्सोड,देशराज भिमटे ,दिनेश दिघोरे,शत्रूधन ढोये, हे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते आणि पधादिकारी उपस्थिती होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत