स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सहविचार सभेचे आयोजन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सहविचार सभेचे आयोजन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : दि.2/8/22 व 3/8/22 रोजी श्री शिव प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत 1 ल्या दिवशी बालवर्ग ते 4 थी च्या वर्गातील तसेच दुसऱ्या दिवशी 5 वी ते 10 वी च्या सर्व पालक व शिक्षक यांची सहविचार सभा अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाली.सदरील सभा विशेषतः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान बाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
या दोन दिवसीय पालक शिक्षक सभेमध्ये शाळेचे व्यवस्थापक श्री विकास पाटील सर यांनी पालकांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले,तसेच शाळेत आगामी काळात राबविणार असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली.तत्पूर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर यांनी दोन्ही दिवशी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.त्यानंतर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन बारी सर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व ध्वज संहिते बाबत माहिती सांगितली.त्यानंतर शाळेतील पदवीधर शिक्षक श्री सागर पवार सर यांनी शाळेत दरवर्षी राबवित असलेल्या शालेय उपक्रम व क्रीडा स्पर्धा याबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे श्रीमती उषा चव्हाण व सौ ललिता राणे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती अनिता सपकाळे व अश्विनी गाढे यांनी केले.अनेक पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.त्यात शाळेच्या उपक्रमाविषयी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री विनोद पाटील, श्री उमेश चौधरी, श्री राजेंद्र सपकाळ, श्री चंद्रकांत पाठक, श्री नितीन पाठक, आदी शिक्षक तसेच सरस्वती शिशु मंदिरातील सर्व शिक्षिका मदतनीस व शिपाई श्री जितेंद्र कानूगो उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत