Breaking News

विरूर स्टेशन ग्रामपंचायत येथील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी भाजपाचे शहर अध्यक्ष भीमरावजी पाला यांची निवड

 विरूर स्टेशन ग्रामपंचायत येथील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी भाजपाचे शहर अध्यक्ष भीमरावजी पाला यांची निवड

तर वन समिती अध्यक्षपदी काँग्रेसच्या सरपंच भाग्यश्री आत्राम यांची निवड 

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरुर : विरुर स्टेशन ग्रामपंचायत मध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पद व वन समिती स्थापन करून अध्यक्ष निवडीची ग्रामसभा पार पडली ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली तंटामुक्ती अध्यक्ष पद हे मागील तीन वर्षापासून काँग्रेसचे राजू ईग्रपवार यांच्याकडे होते तर पहिल्यांदाच भाजपाचे शहर अध्यक्ष श्री भिमरावजी पाला हे तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड ग्रामसभेतून निवड झाली पहिल्यांदाच विरुर स्टेशन येथे वन समिती स्थापन करण्यात आली.

 त्यात एकतर्फी विजय काँग्रेसच्या सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली विरुर स्टेशन येथील सर्व ग्रामस्थांनी तंटामुक्ती अध्यक्ष भीमरावजी पाला व वन समिती अध्यक्ष सरपंच भाग्यश्री आत्राम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्या वेळेस सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत