Breaking News

संस्‍कार भारतीने केलेला सत्‍कार ऊर्जादायी व उमेद वाढविणारा – सुरेखा दुधलकर

 संस्‍कार भारतीने केलेला सत्‍कार ऊर्जादायी व उमेद वाढविणारा – सुरेखा दुधलकर

संस्‍कार भारती चंद्रपूरचा गुरूपौर्णिमा उत्‍सव संपन्‍न

ज्‍येष्‍ठ गायिका सुरेखा दुधलकर यांचा सत्‍कार

कृष्‍णरूप सज्‍जा स्‍पर्धेत श्रावणी काळे व सौम्‍य साहा ठरले विजेते

महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : गुरू शिष्‍याच्‍या नात्‍याला संपन्‍न पौराणिक व ऐतिहासीक परंपरा लाभली आहे. ज्ञानाचे भांडार असलेल्‍या गुरूकडून शिष्‍याने हवे तितके ज्ञान घ्‍यावे व ज्ञानसंपन्‍न व्‍हावे. या नात्‍यात विश्‍वास असणे गरजेचे आहे. कला कोणतीही असो त्‍यात प्रामाणिक भाव असला की तो कलावंत यशाचे शिखर निश्‍चीतपणे गाठतो. या क्षेत्रात मला अजुनही बराच मोठा पल्‍ला गाठायचा आहे. मात्र संस्‍कार भारतीने केलेला हा सत्‍कार मला पुढील प्रवासासाठी ऊर्जा देणारा, उमेद वाढविणारा आहे, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ गायिका व संगीत शिक्षीका सुरेखा दुधलकर यांनी केले.

संस्‍कार भारती चंद्रपूरतर्फे आश्रय बालकाश्रम चंद्रपूर येथे गुरू पुजन व नटराज पुजनाचा कार्यक्रम संपन्‍न झाला. यासोबतच बालकांसाठी कृष्‍णरूप सज्‍जा स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली होती. गुरू म्‍हणून ज्‍येष्‍ठ गायिका व संगीत शिक्षीका सुरेखा दुधलकर यांचा शेला, श्रीफळ, सन्‍मानचिन्‍ह आणि मानपत्र देवून सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी मंचावर स्‍पर्धेच्‍या परिक्षक नृत्‍य शिक्षीका मृणालिनी खाडीलकर, नाटय अभिनेत्री एकता पित्‍तुलवार, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष वसंतराव थोटे यांची उपस्‍थीती होती. यावेळी संस्‍कार भारतीचे जिल्‍हा प्रमुख मंगेश देवूरकर यांनी संस्‍कार भारती चंद्रपूर महानगर शाखेची २०२२-२३ या वर्षासाठी कार्यकारीणी जाहीर केली. संस्‍कार भारती ध्‍येय गीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. श्रीमती पुनम झा, अनुश्री देवूरकर आणि सहका-यांनी गुरूवंदना नृत्‍य सादर केले. कृष्‍णरूप सज्‍जा स्‍पर्धेपूर्वी प्राजक्‍ता उपरकर आणि चमुने कृष्‍णवंदना नृत्‍य सादर केले.

श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमीचे औचित्‍य साधुन वय वर्ष १ ते ५ व ६ ते १० या दोन गटात कृष्‍णरूप सज्‍जा स्‍पर्धा घेण्‍यात आली. यात १ ते ५ वर्षे वयोगटात प्रथम श्रावणी काळे, द्वितीय प्रज्ञेश कांत, तृतीय वेदार्थ थोटे तर ६ ते १० वर्षे वयोटात प्रथम सौम्‍य साहा, द्वितीय स्‍वरा ठाकरे, तृतीय काव्‍य निमजे हे विजेते ठरले. तर त्रीशा पाठक हिला राधेच्‍या भुमीकेसाठी विशेष पुरस्‍कार देण्‍यात आला. विजेत्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते रोख पारितोषीके व प्रमाणपत्रे प्रदान करण्‍यात आली.

यावेळी जाहीर करण्‍यात आलेल्‍या संस्‍कार भारती चंद्रपूर महानगर कार्यकारिणीमध्‍ये अध्‍यक्षपदी अजय धवने, उपाध्‍यक्ष डॉ. राम भारत, सचिव लिलेश बरदाळकर, सहसचिव हर्षल कोडमलवार, अर्पणा घरोटे, कोषाध्‍यक्ष सुजीत आकोटकर, संगीत विधा प्रमुख प्रविण ढगे, संगीत विधा सहप्रमुख प्रणाली पांडे, साहित्‍य विधा प्रमुख सौ. संध्‍या विरमलवार, नाटय विधा प्रमुख सौ. विशाखा देशपांडे, भु अलंकरण (रांगोळी) विधा प्रमुख सुहास दुधलकर, चित्रकला विधा प्रमुख किरण पराते, नृत्‍य विधा प्रमुख प्राजक्‍ता उपरकर, नृत्‍य विधा सहप्रमुख पुनम झा, कार्यकारीणी सदस्‍य स्‍वरूपा जोशी, स्‍वाती घरोटे, राज ताटपल्‍लीवार यांचा समावेश आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक अजय धवने यांनी केले तर संचालन स्‍वाती घरोटे यांनी केले. अहवाल वाचन डॉ. राम भारत यांनी केले. सत्‍कारमुर्तींच्‍या मानपत्राचे वाचन सौ. संध्‍या विरमलवार यांनी केले तर आभार लिलेश बरदाळकर यांनी व्‍यक्‍त केले. कृष्‍णरूप सज्‍जा स्‍पर्धेचे संयोजन प्रणाली पांडे, स्‍वरूपा जोशी आणि स्‍वाती घरोटे यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत