विरुर स्टेशन येथे सरकारी जागेचे खुलेआम खरेदी विक्री
विरुर स्टेशन येथे सरकारी जागेचे खुलेआम खरेदी विक्री
त्या तीन व्यापाऱ्यांनी खरेदी केली महाराष्ट्र शासनाची जमीन
व्यापारी मस्त, प्रशासन सुस्त
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी,प्रविण चिडे,विरुर : विरुर स्टेशन येथील त्या तीन व्यापाऱ्यांनी खरेदी केली महाराष्ट्र सरकार शासनाची जमीन विरुर स्टेशन येथे सरकारी जागेचे खुलेआम खरेदी विक्री व्यापारी मस्त प्रशासन सुस्त असे पाहावयास मिळत आहे विरुर स्टेशन येथील इंदिरानगर एरियामध्ये असलेली सर्वे नंबर 234 ही जमीन महाराष्ट्र शासन सरकार ची असून तिचे खरेदी विक्री थेट काही मोठ्या व्यापाऱ्याकडून केली गेली असे दिसून येत आहे.
विरुर स्टेशन या गावाची लोक संख्या 5000 हजार जवळ पास आहे हे गाव आदिवासी बहुल असून इथे आदिवासी खूप प्रमाणात दिसून येतात शासन निर्णयानुसार 1995 ला हे गाव पेसा शेत्र म्हणून घोषित करण्यात आले इथे आदिवासींना घरकुल योजनेतून घर मिळाले तर त्यांना घर बांधण्यासाठी सरकारी जागा मिळत नाही पण व्यापाऱ्यांना सरकारी जागा कशी मिळते असा प्रश्न गावकऱ्यांच्यां मनात निर्माण होत आहे त्या जागेचे फेरफार रद्द करण्याकरिता ग्रामपंचायतला अर्ज दिला असता त्या अर्जाची दखल घेऊन सरपंच मॅडम व ग्राम पंचायत सदस्य यांनी त्वरित रद्द करण्यासाठी ग्रामसेवक नैताम यांना सूचना दिल्या.
पण ग्रामसेवकांनी ते फेरफार रद्द न करता त्यांनी दुय्यम निबंधक रजिस्ट्री ऑफिस राजुरा यांना पत्र पाठवून या जागेची रजिस्ट्री कशी करण्यात आली हे विचारण्या करिता पत्र पाठवले आहे त्यांचे उत्तर आल्यास आम्ही ते रद्द करू असे ग्रामसेवकांनी सांगून उडवाउडवीची उत्तर दिले तर मा. तहसीलदार साहेब राजुरा यांना सर्वे नंबर 234 चा सातबारा दाखवण्यात आला व त्यांना विचारण्यात आले असता हे सर्वे नंबर 234 जागा महाराष्ट्र शासन सरकारची असून तिची खरेदी व विक्री केल्या जाऊ शकत नाही.
जर का खरेदी विक्री झाले असेल तर ते ग्रामपंचायतला रद्द करण्याचे अधिकार आहे त्यांनी असे सांगितले व तसेच गटविकास अधिकारी यांचे उत्तर येणे बाकी आहे पण गावकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे की सरकारी जमीन खरेदी विक्री करणाऱ्या वर योग्य कारवाई होणार का व त्यांची शासनामार्फत चौकशी केली जाणार का असे कित्येक सरकारी जागा हडप केल्या असतील असा प्रश्न गावकऱ्यांना पडताना दिसून येत आहे.</ p>



कोणत्याही टिप्पण्या नाहीत