निमणी येथे हर घर तिरंगा अभियान
निमणी येथे हर घर तिरंगा अभियान
२५ रुपयांत ग्रामसंघाकडून तिरंग्याचे वाटप
महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निमणी येथे ग्रामसंघाकडून हर घर तिरंगा स्टॉल लावण्यात आले.यावेळी सरपंच सीमा जगताप यांच्या हस्ते हर घर तिरंगा स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले, यावेळी उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक एस डी ढवळे मुख्याध्यापक भालचंद्र कोंगरे शिक्षक गिरसावळे
प्रक्षेत्र अधिकारी शंकर आत्राम ग्रामपंचायत सदस्या सुमन जगताप गिरजा गोबाडे सी आर पी सरिता नगराळे चंदा टोंगे श्रीराम घाटे गजानन गोबाडे शुद्धोधन जगताप श्यामराव दोरखंडे जगन घाटे शिला टोंगे आदी उपस्थित होते, यावेळी उपसरपंच उमेश राजूरकर यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम निमणी येथील प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरी तिरंगा फडकवावा असे आवाहन केले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत