स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने पारनेरच्या प्रभाग क्र १० मध्ये आ. लंके यांच्या हस्ते तिरंगा वाटप !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने पारनेरच्या प्रभाग क्र १० मध्ये आ. लंके यांच्या हस्ते तिरंगा वाटप !
"हर घर तिरंगा" मोहिमे अंतर्गत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांची जनजागृती !
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे, पारनेर : 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या म्हणजे अमृत महोत्सवी वर्षात भारत सरकारच्या हरघर तिरंगा या मोहिमेअंतर्गत पारनेर नगरपंचायतचे उपनगराध्यक्षा सौ.सुरेखाताई भालेकर व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर यांनी पारनेर शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये "हर घर तिरंगा " या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली . व आपल्या प्रभागात जनतेशी संवाद साधत तिरंग्या बद्दलची माहिती व तिरंग्याचा सन्मान कसा करायचा याबद्दल प्रभावीपणे संबोधन केले .
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात संविधान सभा अस्तित्वात आली व 18 जुलै 1947 रोजी आंध्र प्रदेश येथील श्री. व्यंकय्या पिल्ले या व्यक्तीने तिरंगा झेंड्याचे प्रारूप रूप तयार केले .रक्तरंजित स्वातंत्र्य भेटल्यानंतर इंग्रजांचा झेंडा उतरून लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी हा तिरंगा लावण्यात आला . धर्मनिरपेक्ष देशात सार्वभौम विचार करत वरती केसरी रंग म्हणजे देशासाठी अहुती देणाऱ्या वीर जवानांचे शौर्याचे प्रतीक ,
मध्यभागी पांढरा रंग म्हणजे महात्मा गांधी यांनी दिलेला शांततेचा संदेश व सर्वात खाली हिरवा रंग म्हणजे भारत हा कृषिप्रधान देश असून समृद्ध देशाचे प्रतीक म्हणून हा हिरवा रंग संबोधला जातो अशा प्रकारे ह्या तिरंगा झेंड्याचे तीन रंगाचे वैशिष्ट्य आहे . मध्ये अशोक चक्र टाकले आहे .त्याला 24 आरे असून सुजलाम सुफलाम देशात सर्वसामान्य जनतेने 24 तास कार्यरत राहावे असा संदेश या अशोक चक्रातून देण्यात आलेला आहे झेंड्याची साईज लांबी व रुंदी 3x2 फुट या पद्धतीने त्याची रचना केली आहे .अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अर्जुनशेठ भालेकर यांनी नागरिकांना दिली.
तिरंगा झेंडा हा देशाचा सन्मान आहे त्याचा कोठेही अपमान होऊ न देता घर घर तिरंगा ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी व केशरी रंग वर ठेवून प्रत्येक घरोघर हा झेंडा लावून याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी तिरंगा हा देशाचा सन्मान आहे त्याचा कोठेही अपमान होऊ न देता प्रत्येकाने काळजीपूर्वक व आत्मीयतेने ही मोहीम राबवत देशाप्रती असणाऱ्या आपले देश प्रेम सिद्ध करावे . असे उपनगराध्यक्ष सुरेखाताई भालेकर यांनी सांगितले .
पारनेर नगरपंचायतच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाग क्रमांक दहा मध्ये बारा लक्ष रुपयाच्या काँक्रीट रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत " हर घर तिरंगा " मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष विजय औटी ,योगेश मते नितीन अडसूळ , विद्या कावरे ,अशोक चेडे , प्रियंका औटी , सुप्रिया शिंदे , नीता औटी , हिमानी नगरे , भूषण शेलार,श्रीकांत चौरे या नगरसेवकांसह विजय भास्कर औटी , डॉक्टर कावरे ,सचिन औटी , सुभाष शिंदे , सादिक राजे , बंडू गायकवाड , बाळासाहेब मते , बाळासाहेब नगरे , बबन चौरे यांच्यासह प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व शिक्षक वृंद नागरिक व पारनेर शहरवासीय यावेळी उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत